★जय किसान गणेश मंडळाकडून ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यात स्वच्छता मोहीम !
★काळी माती पेपर लगद्यापासून पर्यावरणपूरक गणपतीतून सामाजिक संदेश!
[ जय हनुमान गणेश मंडळाची 61 वर्षाची परंपरा कायम! ]
★चंद्रयान – 3 च्या प्रतिकृतीचा साकारला देखावा यावर्षीही राबवले नवीन उपक्रम
किल्ले धारूर | सुरेश शेळके
किल्ले धारूर येथील जय हनुमान गणेश मंडळाची 61 वर्षापूर्वीची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा काळी माती व पेपर लगद्यापासून पर्यावरण पूरक गणपती तयार करत त्याची प्रतिष्ठापना केली असून यांना चंद्रयान -3 ची प्रतिकृती असलेला देखावा सादर केला आहे. तसेच जय किसान गणेश मंडळाने देखील विविध उपक्रम साजरे करत परंपरा झोपली असून यावर्षी ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवत परंपरा झोपली आहे.
शहरातील जय हनुमान गणेश मंडळाच्या तरुणांनी 61 वर्षापूर्वीची परंपरा कायम ठेवली आहे या मंडळाचे 101 च्या जवळपास सदस्य आहेत. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात विविध प्रकारचे सामाजिक देखावे सादर करत या देखाव्याच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम करत आहेत मंडळाच्या वतीने यांना भारतीय सीमेवरील जवानांचा सत्कार करण्यात आला आहे. शहरांमध्ये वृक्षारोपण तसेच मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल किट विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे भेट दिली आहेत. त्याचबरोबर बुद्धिबळ स्पर्धा जनजागृती रॅली आयोजित करण्यात येणार आहे यंदा या गणेश मंडळाने चंद्रयान-3 ची प्रतिकृती असलेला देखावा देखील सादर केला आहे. होम मिनिस्टर कार्यक्रम शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी स्वच्छता साहित्य वाटप आरोग्य विषय जनजागृती रॅली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंडळाने यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याची काम केले आहे.
★श्री गणेशाची स्थापना पण पर्यावरणपूरक!
जय हनुमान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा काळी माती, घोड्याची लीद, पेपर लगदा, शेंदूर याचा वापर करत पर्यावरण पूरक गणपती तयार करून याची गणपतीची प्रतिष्ठापना केली यातून मंडळाने पर्यावरण संरक्षणाचा मोलाचा संदेश दिला आहे.
★जय किसान मंडळाकडून किल्ल्यात स्वच्छता मोहीम
जय किसान गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेऊन गणेश उत्सव साजरा केला जातो यावर्षी देखील विविध उपक्रमाने गणेश उत्सव साजरा होत आहे. किल्ले धारूर मधील ऐतिहासिक ठेवा असलेला महादुर्ग किल्ल्यात बुरुज स्वच्छता अभियान राबवले आहे. अशा उपक्रमाने त्यांचं कार्य सातत्याने सुरू आहे त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक देखील होत आहे.