तेजस अर्बन च्या सातव्या वार्षिक सभेला उपसथित रहा – सचिन घिगे
बीड | सचिन पवार
तेजस अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड ची सातवी वार्षिक सभा दिनांक दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा संस्थेच्या सभागृहामध्ये होत आहे, या सभेला संस्थेच्या सभासदांनी उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घीगे यांनी केले आहे.
थोडक्यात माहिती अशी की गेल्या सात वर्षांपूर्वी बीड शहरात तेजस अर्बन कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड कार्यक्षेत्र बीड जिल्हा या संस्थेची मुहूर्तमेढ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष Adv प्रकाश दादा कवठेकर यांनी रोवली आहे. संस्थेने आजपर्यंत नोटाबंदी सारखा काळ, कोरोना सारखा संघर्षमय काळ, दुष्काळजन्य परिस्थिती अशा परिस्थितीत सुद्धा संस्थेने बीड शहरासहित पाच ठिकाणी सात वर्षांमध्ये पाच शाखा चालू करून प्रत्येक शाखा नफ्यामध्ये आलेली आहे संस्थेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात संस्थेच्या वतीने सामाजिक हित जोपासण्याचे काम संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळाच्या आदेशाप्रमाणे चालू आहे. संस्थेची आज होत असलेल्या सातव्या वार्षिक सभेमध्ये सभासदांसाठी लाभांश वाटप डिजिटल बँकिंगच्या संदर्भातले अत्याधुनिक सुविधा देण्याचा संस्थेचा मानस आहे तरी आज होणाऱ्या या सभेस संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद यांनी वेळेवर सकाळी अकरा वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालय बीड येथील सभागृहात उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सचिन घिगे यांनी केले आहे.
★प्रकाश दादांनी सर्वसामान्यांच्या जीवनात टाकला प्रकाश!
तेजस अर्बन कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड च्या माध्यमातून प्रकाश दादा कवठेकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचं काम केलं आहे. संस्थेने आजपर्यंत नोटाबंदी सारख्या काळात, कोरोनासारख्या संघर्षमय काळात, दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा शहरासहित पाच ठिकाणी सात वर्षांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत सामाजिक हित जोपासण्याचे काम केले आहे.