★ 5 लाख 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल नष्ट !
जालना | प्रतिनिधी
जालना शहरातील विविध ठिकाणी पाच गावठी अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून ५ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
जालना शहरातील महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे अवैध दारूविक्री व तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे एसपींनी आदेश दिले आहेत. एलसीबी पथकाने विविध पथके स्थापन करुन शहरातील गावठी हातभट्टी तयार करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले.पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी कैकाडी मोहल्ला, नूतन वसाहत भागात ही कारवाई करण्यात आली आहे. रसायन, प्लास्टिक व लोखंडी ड्रम, कॅन, चालू हातभट्ट्या व गावठी हातभट्टी दारू असा मुद्देमाल जप्त करुन नाश करण्यात आला आहे. यात पाच आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाल, आशिष खांडेकर, प्रमोद बोंडले, राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, गोपाल गोशिक, कृष्णा तंगे, रुस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, रमेश राठोड, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजने, सतीश श्रीवास, इरशाद पटेल, रवी जाधव, कैलास चेके, योगेश सहाणे, सचिन राऊत, संजय राऊत आदींनी केली आहे.