★सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला निषेध
किल्लेधारूर | प्रतिनिधी
सप्टेंबर रोजी शासनाने कंत्राटी पदभरतीचा शासन आदेश काढून युवकांच्या आयुष्याची राख रांगोळीच करतानाची ही सुरुवात केली आहे, या आदेशाची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने धारूर येथे होळी करून यांचा निषेध करण्यात आला हा आदेश तात्काळ रद्द करावा नसता तिंव्र अंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या काढलेला शासकीय आदेश हा तरुण तरुणीच्या बेरोजगारी कडे वाटचाल करताना दिसतो आहे. बाह्य यंत्रणेचा वापर करून आपल्या जवळच्याच व्यक्तींच्या 9 कंपन्यांची नियुक्ती करून आपण खाजकिकरण करण्याचा घातलेला घाट हा बरोबर आहे का.कंत्राटी भरतीच्या विरोधात किल्ले धारूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस किल्ले धारूर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात कंत्राटी पद भरतीच्या शासकीय आदेशा ची होळी करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश थोरात,बाळासाहेब नखाते,नाना चव्हाण,रोहित गायकवाड,योगेश अंधारे,निलेश शिनगारे,भैया भालेराव,विशाल लोखंडे,अशोक राऊत,अजिंक्य वाघमारे, फेरोज भाई,अशोक गव्हाणे,सुरेश बडे,संभाजी बडे,दिपक दराडे,अभिषेक चौरे,सदाशिव काळे,बाळासाहेब बडे जनक डापकर,सुधीर गिरी,बाबा गिरी,हरिदास पवार,सुधीर उमाप, तुळशीदास पवार, बलभीम राख, इत्यादी उपस्थित होते.