19.7 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

नवमतदार युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे – मस्के, शिराळे

★बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगावी..!

बीड | प्रतिनिधी

आगामी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायत आदि प्रत्येक निवडणुकीत सहभाग घेणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रशासन स्तरावर मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नवमतदार युवकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावेत. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व जिल्हा सचिव नवनाथ शिराळे यांनी केले आहे.
‘भारतीय जनता पार्टी तर्फे मतदार यादीतील नावांची पडताळणी करण्यासाठी मतदार चेतना अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात आहे. या अभियानात नवीन मतदारांची नोंदणी, नावांची, पत्त्याची दुरुस्ती ही कामे केली जातील. त्याबरोबरच बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठीही या अभियानाद्वारे प्रयत्न होणार आहेत. मतदार नोंदणीसाठी मतदारांना आवश्यक ते सहकार्य केले जाणार आहे. नवमतदारांची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.मतदारांची नावे चुकीची असणे, पत्ते चुकीचे असणे यासारख्या प्रकारातून हक्काचे मतदान होऊ शकत नाही. त्यासाठी नावांच्या आणि पत्त्याच्या दुरुस्त्या करून घेणे आवश्यक आहे. बोगस मतदारांची नावे शोधून त्यांची नावे वगळली जावेत यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडे आग्रही भूमिका पक्षा मार्फत घेतली जाईल.18 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे. अर्जासोबत लागणारी कागदपत्रे नवीन मतदार नोंदणी- मतदारांचे छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा, निवासस्थानाचा पुरावा (सेल्फ अटेस्टेड कॉपी) • नवीन मतदार नोंदणीसाठीचा अर्ज समक्ष दाखल करता येतो किंवा ऑनलाईनही दाखल करता येतो. • एखाद्या मतदाराबाबत असलेली हरकत, आक्षेप नोंदविण्यासाठी त्याच मतदारसंघातील मतदाराने अर्ज करावा. तरी ज्या मतदार बांधवांचे मतदार यादीत नाव नाहीत अशा सर्व मतदार बांधवांनी व नवमतदार युवकांनी आपले नाव मतदार यादीत नाव नोंदवून घ्यावेत असे आवाहन राजेंद्र मस्के आणि नवनाथ शिराळे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!