★नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या हस्ते गणेशाची आरती
किल्ले धारूर | सुरेश शेळके
जय हनुमान गणेश मंडळाच्या तिसऱ्या दिवशी च्या आरतीचा मान धारूर शहराचे नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली.
जय हनुमान गणेश मंडळाचा आगळा वेगळा कार्यक्रम सामाजिक सलोखा जोपासत आपल्या किल्ले धारूर शहरांमधील पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या चा सत्कार करण्यात आला त्यामधील ज्ञानोबा सोनवणे चांभार लक्ष्मण सत्वधर माळी , बाबासाहेब भोसले शेतकरी , भारत गवळी लोहार, हे सर्वजण आपला पारंपारिक व्यवसाय जोपासत आपल्या कुटुंबाचे या अत्याधुनिक जगामध्ये आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहेत व आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जात आहेत त्यामुळे जय हनुमान गणेश मंडळ ने या सर्वांचा सत्कार केला त्यानंतर लागलीच मेरी माटी मेरा देश हा देखील कार्यक्रम जय हनुमान गणेश मंडळाने घेतला त्यावेळी जय हनुमान गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.