★पाटोदा तालुक्यातील गावची गाव उतरले आरक्षणासाठी रस्त्यावर
पाटोदा | सचिन पवार
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तीव्र होत चालल आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन त्याचं रूपांतर अधिक व्यापक झाल आहे. अंतरवाली सराटी येथून पडलेली मराठा आरक्षणाची ठिणगी आता महाराष्ट्रभर पोहोचली असून दिल्लीच तक्त देखील हालू लागले आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाची ठिणगी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.
पाटोदा तालुक्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होत चालला आहे. मराठा समाजाचे अधिकृत ओबीसीकरण करण्यासाठी पाटोदा तालुक्यात मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सौंदाना, वैद्यकीन्ही, बेनसूर, वैजाळा, पाचेगाव, बेडकवाडी, पाचंग्री, मंजरी, ब्राह्मणवाडी, दासखेड, सोनेगाव, मेंगडेवाडी, बामदाळवाडा, भाकरीवस्ती तसेच ढाळेवाडी, पारगाव, अनपटवाडी, नफरवाडी, पाटोदा, ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथून सर्व रॅली एकत्रित होऊन पाटोदा तहसीलवर दुपारी बारा वाजता दाखल होणार आहे. सर्वच गावांनी या भव्य मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवला आहे. या भव्य मोटरसायकल रॅलीच्या समारोपासाठी पाच मुलींचे भाषणाचे नियोजन केले असून त्यानंतर निवेदन त्यांच्याच हस्ते देण्यात येणार आहे मोटरसायकल रॅलीमध्ये सामील होणाऱ्या बांधवांची सुरक्षा जिम्मेदारी सर्वस्वी स्वतःचीच राहील अशी सूचना करण्यात आली असून सर्व बांधवांनी स्वतःची जबाबदारी समजून रॅलीत सहभागी व्हावे असे देखील आव्हान करण्यात आले आहे.
★मराठ्यांनो उठा आणि सामील व्हा!
मराठा समाजांना अधिकृत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होत चालला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मराठा आरक्षणाचा मुद्दा पोहोचला आहे. गावची गाव या आरक्षणाच्या मागणीसाठी उठाव धरू लागली आहेत. पाटोदा तालुक्यात प्रत्येक गावातील नागरिक मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाचा मार्ग पुढे करत ही पेटलेली मराठा आरक्षणाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम करत आहे.