★डॉ दत्ता नलावडे, डोंगरे विजयकुमार, वाजे रामेश्वर, घोरपडे विक्रम, शेख मुन्शी बाबामिया यांचा समावेश
बीड | प्रतिनिधी
बीड येथील शिक्षक नेते द.बा. घुमरे शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निवडी झाल्या असून त्या नुकत्याच जाहीर करण्यात आले आहेत. हा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ हॉटेल ग्रँड यशोदा येथे संपन्न होणार असल्याची माहिती दीपक घुमरे यांनी दिली आहे.
द.बा. घुमरे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामध्ये हॉटेल ग्रँड यशोदा येथे दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून यावर्षी चा आदर्श शिक्षक पूरस्कार वाजे रामेश्वर आसाराम, दत्तात्रय साहेबराव नलावडे, डोंगरे विजयकुमार बाबुराव, घोरपडे विक्रम बबनराव, इंगोले अतुल गोरख, शेख मुन्सी बाबामिया यांना जाहीर झालं असून या शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ बीड येथील हॉटेल ग्रँड यशोदा येथे दि 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा संपन्न होणार असून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहंन दिपक घुमरे यांनी केले आहे.