★भाजपने वाचाळवीरांना आवरावे अन्यथा त्यांच्या तोंडाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस काळे फासले !
बीड | प्रतिनिधी
गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जावुन केलेली टीका निषेधार्ह असून हे वक्तव्य केवळ प्रकाश झोतात येण्यासाठी केले आहे!’ असे सांगत त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या थोबाडा ला काळे फासू!!’ असा थेट इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रुपेश बेद्रेपाटील यांनी दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यावर अत्यंत हीन शब्दात टीकास्त्र केले होते. याचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रुपेश बेद्रेपाटील यांनी त्यांचा एका व्हिडिओतून समाचार घेतला आहे. त्यातून त्यांनी अजितदादावर खालच्या थराच्या केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. पडळकर यांचे मानसिक संतुलन ढासाळल्या सारखी स्थिती झाली असून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नीच प्रवृत्तीची अशी ही लोकं महायुतीत दुरावा निर्माण करीत आहेत हे निषेधार्ह असून पडळकर हे मंगळसूत्र चोर आहेत. दादांबद्दल त्यांचे वक्तव्य अत्यंत निषेधार्थ असून त्यांनी तात्काळ माफी मागावी आणि विषय संपवावा अन्यथा जिथे दिसतील तिथे त्यांच्या थोबडा ला काळेफासू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रुपये पाटील यांनी दिला असून जाहीर धिक्कार केला आहे.
★पडळकर विकृतीच्या थोबाडाला काळेफासू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा
भाजपाने पडळकर सारखे विकृती वाचाळवीर पक्षामध्ये घेऊन त्यांना पाठबळ दिल्याने महाराष्ट्रातील संस्कृती बिघडत चालली आहे. राजकारणात येणाऱ्या नवीन तरुणाईने पडळकर सारख्या वाचाळवीरांचा काय आदर्श घ्यावा हाच सध्या प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय जनता पक्षाने अशा वाचाविरांना तात्काळ आवरावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अशा वाचाळवीरांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.