श्री विनायक विद्यालयाची कु.साक्षी बाबर गोळाफेक मध्ये प्रथम !
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील श्री विनायक माध्यमिक विद्यालय वैद्यकीन्ही विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये गोळा फेक मध्ये कुमारी साक्षी बाबर हिने तालुक्यातील प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाची मान उंचावली आहे.
तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये श्री विनायकराव माध्यमिक विद्यालय, वैद्यकीन्हीची कु.साक्षी बाबर हिने 17 वर्षे वयोगट गोळाफेक क्रिडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवत संस्थेच्या अभिमानात भर टाकली आहे, त्याबद्दल संस्था सचिव मा.भागवत आण्णा आजबे व अध्यक्ष मा. बाजीराव आण्णा बांगर आणि पदाधिकारी, मुख्याध्यपक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशिक्षक श्री रमेश आजबे सर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..