★बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वरूणराजा विजांच्या कडकडाटासह बरसला!
बीड | सचिन पवार
आज ज्येष्ठ गौरीच आगमन झाल्याने वरूणराजा तितकाच जोरदार बरसला आणि शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंदाचे नवचैतन्य निर्माण केले. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर वरून राजा गौरी लक्ष्मीच्या पावलाने वरूणराजा जोरदार बरसल्याने शेतकरी राजावर आनंदाची बहर फुलली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये वरूणराजा अनेक दिवसात पासून पाठ फिरवली होती. पूर्णपणे करपून जळून चालली होती तर काही भागांमध्ये पूर्णपणे पिकांचं नुकसान झाला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला होता. पण आज ज्येष्ठा गौरीच आगमन होतात लक्ष्मीच्या पावलाने बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वरूणराजा विजाच्या कडकडाटासह असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची बहर फुललेली पाहायला मिळाली आहे..
★लक्ष्मीच्या पावलाने वरूणराजा बळीराजाच्या दारी!
लक्ष्मीच्या पावलाने वरूणराजाने लावलेली हजेरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करणारा आहे. शेतकरी राजावर आलेलं खूप मोठं संकट टाळण्याचा प्रयत्न गौरी लक्ष्मीच्या पावलाने झाला आहे. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. परंतु पुढच्या पिकासाठी वरूणराजाची खूप अपेक्षा आणि गरज होती ती आज खऱ्या अर्थाने लक्ष्मीच्या पावलाने भरून निघाली असं म्हटलं तर वावगं वाटायला नको.
★कुसळंब परिसरात जोरदार पाऊस
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे रात्री साडेसात आठच्या सुमारास जोरदार पाऊस झाला शेतकऱ्यांवर आलेलं संकट थोडफार टळू शकतो परंतु मोठ्या पावसाची अपेक्षा होती आणि तोच आज गौरी आगमनाने आल्याने सर्वांचा आनंद गगनाला मावेनासा झाला आहे. खऱ्या अर्थाने आज लक्ष्मीच्या पावलाने वरूणराजा शेतकरीराजाच्या दारी आला आहे असंच म्हणावं लागेल..