★आष्टी येथील 132 /33 के. व्ही सबस्टेशन येथे 6 कोटीचा 50 एम.व्ही.ए. चा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर!
[ आमदार बाळासाहेब आजबे शेतकरी पुत्र शोभताय बरं..]
आष्टी | सचिन पवार
आष्टी तालुक्यातील 132/ 33 KV सब स्टेशन येथे 50 एम व्ही ए चे दोन ट्रान्सफर सध्या सुरू आहेत त्यावर 90 MW चा लोड असूनत्यामुळे या ठिकाणी 50 MVA चा ट्रांसफार्मर मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला होता त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्यासआज आष्टी येथे 06 कोटी किमतीचा 50 MVA ट्रांसफार्मरलाआज राज्य सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी दिली. याबाबत पुढे बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की आष्टी तालुक्यात 132/33 KV हे उच्च दाबाचे सबस्टेशन आहे परंतु त्यामध्ये 90 एम डब्ल्यू चा लोड असल्याने शेतकऱ्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागत होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागनीनुसार आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे आष्टी या ठिकाणी 50 एम व्ही ए चा ट्रांसफार्मर मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली होती त्यास आज ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रशासकीय मंजुरी देत आष्टी या ठिकाणी सहा कोटी रुपये किमतीचा 50 MVA चा ट्रांसफार्मर मंजूर केला आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वीज टंचाई कमी होऊन उच्च दाबाने शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे, येणाऱ्या काळातील विजेता प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी सांगितले आष्टी येथील 132/ 33 या सबस्टेशन वर आठ फिडर असून 20 सबस्टेशन आहेत या सर्व सबस्टेशन मधून कमी दाबाने शेतीपंपासाठी वीजपुरवठा होत होता अशी ओरड गेल्या दोन वर्षापासून शेतकरी वर्गातून केली जात होती या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आष्टी येथे सहा कोटी किंमतीचा नवीन 50 एम व्ही ए चा ट्रांसफार्मर मंजूर करून घेतला आहे या मंजुरी बाबत आमदार या नात्याने मी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो असे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
★शेतकऱ्यांचा लाईटचा प्रश्न कायमचाच मिटणार
शेतकऱ्यांसाठी अति जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा असणारा प्रश्न शेतकरी पुत्र आष्टी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे यांनी सोडवला आहे. शेतकऱ्यांना आता आम्हाला लाईट मिळत नाही असा प्रश्न कधीच उद्भवणार नाही त्यांना 24 घंटे शेतीपंपासाठी मिळावी यासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी विशेष प्रयत्न करून सहा कोटी रुपयांच 50 एम व्ही ए चा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला असून शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मिटवला आहे.
★शेतकरी म्हणतोय आमदार आजबे शेतकरी पुत्र शोभताय बरं…
शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार बाळासाहेब आजबे यांनी आतापर्यंत आवाज उठवला आहे आणि त्याचा निकालही लावला आहे एक प्रकारे आमदार बाळासाहेब आजबे यांचे काम बोलतोय अशीच चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मग पाणी लाईट रस्ते यावर विशेष भर देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे यांनी केल्याने सर्व शेतकरी वर्गातून त्यांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.