★वांजरा फाट्यावर बस थांबा करा ; अन्यथा तीव्र आंदोलन – मेजर शिवाजी पवार
★त्रिदल सैनिक संघटना, सर्व सरपंच, नेतेमंडळी, ग्रामस्थांना सोबत करणार तीव्र आंदोलन
★पत्रकार सचिन पवार अनिल गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे आ.बाळासाहेब आजबेंनी बस थांबा केला मंजूर!
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा येथे बस थांबा करणे अत्यंत आवश्यक आहे. आजी-माजी सैनिक शाळेतील विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक धार्मिक भाविक भक्त मोठ्या संख्येने मांजरा फाट्यावरून ये जात करतात परंतु त्या ठिकाणी बस थांबा नसल्याने सर्वांची मोठी अडचण होत आहे. याकडे एसटी मंडळाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी तात्काळ निकाल काढावा अन्यथा त्रिजर्स सैनिक संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा तरी सैनिक संघटनेचे पाटोदा तालुका अध्यक्ष, मराठवाडा प्रमुख तथा मा.आदर्श सरपंच शिवाजी पवार यांनी दिला आहे.
वांजरा फाटा हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून दहा ते पंधरा गावांना जाण्यासाठीचा महत्त्वाचा स्पॉट आहे. ठिकाणावरून बीड पाटोदा जामखेड नगर मुंबई पुणे या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते मग सैनिक असतील विद्यार्थी असतील सर्वसामान्य नागरिक असतील धार्मिक क्षेत्रातील भाविक भक्त असतील ते सुद्धा याच ठिकाणावरून बीड नगर जामखेड पाटोदा मुंबई पुणे या ठिकाणी जाण्यासाठी येतात परंतु बस थांबा नसल्याने सर्वांचीच मोठी अडचण होत आहे. त्याचबरोबर आर्थिक आणि वेळेचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तात्काळ बस थांबा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सैनिक संघटने कडून देण्यात आला आहे. तसेच या बस थांबा करण्यासाठी पत्रकार सचिन पवार अनिल गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले असून येथे बस थांबा सुद्धा मंजूर केल्याची माहिती मिळाली आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर कसलीच कारवाई केलेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्रिदल सैनिक संघटनेचे मराठवाडा प्रमुख, पाटोदा तालुका अध्यक्ष तथा मा.आदर्श सरपंच मेजर शिवाजी पवार यांनी दिला आहे.
★पत्रकार सचिन पवार, अनिल गायकवाड यांच्या प्रयत्नाने बस थांबा मंजूर
वांजरा फाटा येथे बस थांबा करण्यासाठी पत्रकार सचिन पवार व पत्रकार अनिल गायकवाड यांनी विशेष प्रयत्न करून आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडून बस थांबा मंजूर केला आहे, त्याचं काम लवकरच सुरू होऊन त्या ठिकाणी उभारणी होईल परंतु तत्पूर्वी संबंधित बस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मशीन मध्ये मांजरा फाटा थांबा करावा व नागरिकांचे आर्थिक व वेळेचे नुकसान टाळावे हीच अपेक्षा आहे.
★श्री क्षेत्र खंडोबा, भगवान बाबा, हनुमान गड, गहीनाथगड मोठे तीर्थक्षेत्र!
मांजरा फाटा हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणाहून भाविक भक्तांना श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान श्रीक्षेत्र भगवान भक्ती गड श्री क्षेत्र हनुमान गड श्री क्षेत्र गहिनीनाथ गड यासारखी महत्त्वाची मोठी धार्मिक स्थळे असल्याने भाविक भक्तांची मोठी वर्दळ असते परंतु भाविक भक्तांना येण्या जाण्यासाठी बसची व्यवस्था तुरळ त्याचबरोबर वांजरा फाटा येथे बस थांबा नसल्याने मोठी अडचण व आर्थिक वेळेचं नुकसान होत आहे, त्यामुळे वांजरा फाटा येथे अधिकृत बस थांबा होणे अत्यंत आवश्यक आहे, याकडे अधिकाऱ्याने गांभीर्याने घेऊन तात्काळ बस थांबा चा निकाल काढावा एवढीच अपेक्षा आहे.