★भाजप सरकारच्या मनमारी कारभारामुळे विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचा मोठा संकट – कुंदन काळे
बीड | प्रतिनिधी
भाजप सरकारच्या मनमानी कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष आमदार संदीप भैया क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजप सरकारच्या कंत्राटी कर भरती जीआरचे दहन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, पक्षातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी 75 हजार मेघा नोकरी भरती करण्याचे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात मात्र नोकरी देण्याची वेळ आली तेव्हा कंत्राटी पाच वर्षाची नोकरी तरुणांना बेरोजगारांना पुन्हा पाच वर्षांनी नोकरी शोधण्याची वेळ येणार आहे. सरकारच्या या मनमानी जीआरची कंत्राटी नोकरीचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जीआर ची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर हा जीआर रद्द करून इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कायमस्वरूपी बेरोजगारी नोकरीचा प्रश्न दूर होऊन सुधारित जीआर निघाला पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गाव पातळीवर तालुका स्तरावर सार्वजनिक ठिकाणी यासह तरुणांनी युवकांनी कंत्राटी नोकरी भरती संदर्भात रस्त्यावर उतरला पाहिजे अन्यथा पुन्हा महाराष्ट्राचे खाजगीकरण करून नोकरीसाठी भाजप कार्यालय किंवा आदानी अंबानी यांच्या दारात बसण्याची वेळ तरुणांवर युवकांवर येईल यावेळी उपस्थित केके वडमारे प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, कुंदन भैया काळे प्रदेश संघटक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र, पंकज बाहेगवानकर, दीपक हजारे, दादा हातागळे, सुशील जाधव, निखिल सवाई, संकेत धुरंदरे, अमोल ठेंगरे, बंटी ससाने, वल्लभ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेस संघटनेचे विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकार विरोधी घोषणा देऊन भाजप सरकार मुर्दाबाद मृदाबाद म्हणत शासनाच्या अधिकृत जीआरची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
★भाजप सरकार तरुणांसाठी घातक!
भारत हा तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो परंतु भाजप सरकारच्या काळामध्ये तरुणाईची बेरोजगारी वाढत चालली आहे. सर्व क्षेत्रात सुरू असलेलं खाजगीकरण तरुणांच्या मुळावर उठले आहे येणाऱ्या काळात हे खाजगीकरण थांबून तरुणाईला नवीन उमेदवारी जगण्याची हिंमत देण्यासाठी काम करावे अन्यथा नोकरीसाठी भाजप कार्यालय आदाने अंबानी यांच्या दारात बसण्याची वेळ तरुणाईवर येईल यातील मात्र शंका नाही. भाजपच्या काळात तरुणाईवर गाडीचं आलेलं घातक संकट आहे.