★गुत्तेदार व अधिकाऱ्यांना दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचा दिला अल्टिमेट
आष्टी | प्रतिनिधी
गेल्या चार वर्षापासून आष्टी बसस्थानकाचे कासव गतीने काम चालू असून,अघ्यापही बसस्थानकाचे काम पुर्ण नाही.यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याच्या तक्रारी आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडे येताच स्वत;आ.आजबे यांनी बसस्थानक गाठत कामांची पाहणी करून संबंधित गुत्तेदार व एस.टी.महामंडळाच्या अधिका-यांना झाप-झाप झापत हे काम कधी पुर्ण होणार,होत नसेल तर काम सोडून द्या,आता प्रत्येक आठ दिवसाला मी स्वत;येऊन पाहणी करत काम लवकर पुर्ण करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असे ओळख म्हणून असलेल्या आष्टी बसस्थानकाचे काम गेल्या चार वर्षापासून रेंगाळत सुरू आहे.मध्यंतरी कोव्हिडमुळे काम बंद आले होते.परंतु आता सर्व सुरूळीत झाले असूनही आष्टी बसस्थानकाचे काम कासव गतीने सुरू असल्याने प्रवशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत अशा तक्रारी आमदार आजबे यांच्याकडे आल्याने सोमवार दि.१८ रोजी दुपारी २ वा.आ.आजबे यांनी बसस्थानक गाठत कामाची पाहणी करत संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांना बोलावून ह्या बसस्थानकाचे काम किती दिवसात पुर्ण होणार? गुत्तेदाराला जर काम पुर्ण होत नसेल तर सोडून जा ?लवकरात लवकर काम पुर्ण करा आता प्रत्येक सोमवारी मी स्वत;येऊन कामाचा आढावा घेणार असल्याचे सांगत गुत्तेदार व अधिकारी यांना झाप-झाप झापले व आमदार आजबेंचा रूद्र आवतार पाहून गुत्तेदारही परेशान होत लवकरात लवकर काम पुर्ण होणार असून,तुम्हाला प्रत्येक आठवड्यात कामाची प्रगती दिसेल अशी ग्वाही दिली.या बसस्थानच्या पाहणी दरम्यान राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,माजी जि.प.अध्यक्ष डाॅ.शिवाजी राऊत,नगरसेवक नाजिम शेख,कड्याचे राष्ट्रवादीचे नेते सुनिल नाथ,संदिप सुंबरे,संदिप अस्वर, नगरसेवक नाजिम शेख,यांच्यासह एस.टी.महामंडळाचे अधिकारी व गुत्तेदार आदि उपस्थित होते.