मराठ्यांचं सळसळत रक्त उसळले ; आरक्षण मिळेपर्यंत उसळत राहणार!
फडणवीसांना मराठ्यांच वावडे का ?
★अख्खा महाराष्ट्र मराठा समाजाच्या आंदोलनात ; फडणवीसांना मात्र वेळ मिळेना!
बीड | सचिन पवार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाविषयी केलेलं वक्तव्य हे मराठा समाजात अधिक तीव्र रोष निर्माण करणारे आहे. एकतर आंतरवाली सराटी येथे त्यांच्या आदेशानुसार झालेला लाठीचार्ज आणि गोळीबार हा अतिशय निंदनीय होता. त्याचबरोबर त्यांनी मराठा आंदोलनाच्या ठिकाणी एकही वेळेस भेट दिली नाही. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाने मराठा समाजाला ओबीसीमध्ये न घेण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होऊन मराठा समाजाविषयी पोटातील द्वेष तोंडामध्ये आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजाबद्दलचा अंतर्भाव अतिशय कुरुर असल्याचे स्पष्ट होत आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक जिव्हाळ्याचा आणि तीव्र होत असताना फडणवीस मराठ्यांचा द्वेष करण्यासाठी संधी सोडायला तयार नाहीत. मराठा समाजाला ज्या ठिकाणी खिंडीत पकडण्याची संधी सापडेल तिथे खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु फडणवीस साहेब तुम्ही लक्षात ठेवा हा मराठा समाज आहे तुमची खिंड तोडून तुमच्या भवताली कधी भिंत उभा करेल आणि तुम्हाला त्या भिंतीमध्ये कधी समाधी घ्यायला लावी हे सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही मराठा द्वेष दूर करा अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला जिवंत समाधी घ्यायला मराठा समाज भाग पाडेल यातही तीळ मात्र शंका नाही. मराठा समाज अतिशय तीव्र होत चालला असून सोशल मीडियावर त्याचे कठोर पडसाद उमटत आहेत. फडणवीस जेव्हा मराठा समाजाचा द्वेष करता येत नाही तेव्हा मराठा समाजातील नेत्यांना पुढे करत मराठा समाजात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हीच त्यांची क्रूर नीती समोर येऊ लागली आहे. येणाऱ्या काळात मराठा समाज देखील तुमची तुमच्यात समाजाकडून पूजा पाठ करून तुमची जिवंत समाधी घ्यायला भाग पाडल जाईल अशा सुद्धा सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. ज्यावेळेस राज्यकर्ते हिटलर प्रमाणे वागतात त्यावेळेस सुद्धा त्यांचा अंत देखील हिटलर प्रमाणेच होतो यातही तीळ मात्र शंका नाही. पण असं मराठा समाज खालच्या पातळीचा कधीच जाणार नाही परंतु संत महंतांनी म्हणून ठेवला आहे की जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर याच पद्धतीने फडणवीसांना सुद्धा त्यांच्या कर्माचे फळ भेटतील यातही तीळ मात्र शंका उरलेली नाही अशा भावना मराठा समाजातून पुढे येत आहेत..
★फडणवीस साहेब तुमचे जसे कर्म तसेच तुम्हाला सुद्धा फळ मिळेल!
संत महानतांनी म्हणून ठेवला आहे की जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर याच म्हणीप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण करून वागत आहेत त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच येणाऱ्या काळात भोगावे लागतील यातही तीळ मात्र शंका उरली नाही. इतका द्वेष करणारा नेता महाराष्ट्रात पाहिला नाही जेव्हा जेव्हा फडणवीस यांना पाहिलं जातं तेव्हा तेव्हा हिटलरची आठवण येते आणि त्याचा अंतही आठवतो त्यामुळे जसे कर्म तसे फळ फडणवीसंना सुद्धा मिळणार यातही तीळ मात्र शंका उरली नाही अशा भावना सोशल मीडियावर मराठा समाजाकडून व्यक्त होत आहेत.
★मराठा समाजाबद्दल फडणवीस यांना इतका द्वेष का ?
मराठा समाजाने भारतीय जनता पक्षातील सर्वच नेत्यांना मग तिथे मराठा असेल ओबीसी असेल किंवा इतर कोणत्याही जातीतील नेत्यांना भरभरून प्रेम दिल परंतु तेच नेते आज मराठा समाजावर संकट असताना मराठा समाजाच्या विरोधातच उभारताना दिसत आहेत. सर्वात जास्त दुर्दैव म्हणजे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन देव मोदीला साथ म्हणणारे फडणवीस तर सर्वात जास्त द्वेष करताना दिसत आहेत त्यामुळे मराठा समाजामध्ये अधिक तीव्र रोष निर्माण होताना दिसत आहे.
★मराठा समाज आता पेटलाय विजन मुश्किल!
मराठा समाज एकतर पेटत नाही आणि पेटला तर विजत नाही. मराठा समाजाच्या अति जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे महाराष्ट्र सरकार गंभीर असल्याचे दिसत नाही. पण मराठा समाज आता पेटलेला आहे तो विजणार नाही तर मराठा समाजावर पेटून उठलेल्या नेत्यांना विजवल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठा समाज आता आरक्षण मिळाल्याशिवाय विझणार नाही आणि शांत बसणारही नाही. ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण मिळेल त्याच वेळेस मराठा समाज शांत होईल अशीच भावना मराठा समाजाकडून सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे.