मुक्तीसंग्राम
देशाला स्वातंत्र्य मिळालं पण
मराठवाडा झाला नव्हता मुक्त
निजामशाहीची दहशत अन्
दबाव तंत्र असायचं फक्त.
काश्मीरसारखे वेगळे राज्य
निजामाला हैदराबाद होते हवे,
रझाकारांची संघटना बनवून
केले होते वेगवेगळे कावे.
अन्याय अत्याचार करून
रझाकारांनी खूप छळलं,
मराठवाडा मुक्तीसंग्रामांनं
स्वातंत्र्याचं खरं महत्त्व कळलं.
मराठवाडा मुक्तीचा लढा
प्रत्येक गावागावात लढला.
न्याय हक्कापायी स्वातंत्र्यवीर
तेव्हा समोरासमोर भिडला.
सैनिक फौजांनी जेव्हा घेरले
तेव्हा निजामाला दिसलं मरण,
मग भितीपायी बिनशर्त
तो पण आला होता शरण.
कित्येक स्वातंत्र्यवीरांनी तेव्हा
इथं सांडलं होतं रक्त,
त्यांच्या त्याग व बलिदानामुळेच
मराठवाडा झाला होता मुक्त!
झाला होता मुक्त!!
– श्री.संजय शेळके सर
मो.99752 28585