मराठा आरक्षणाचा मुद्दा जिव्हाळ्याचा ; त्यामुळे बोलताना जरा जपून !
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मराठा समाजाचे चळवळीतील कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला नेत्यांची अजिबात गरज उरलेली नाही, कारण की नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही अपेक्षा नाहीच. सर्वसामान्य मराठा समाज आता रस्त्यावर उतरून स्वतःची लढाई स्वतःच लढत आहे. आता ही आरपारची लढाई सुरू झाल्याने सर्व नेतेमंडळीने आता बोलताना थोडं जपून बोलावं अन्यथा मराठा समाजाशी घाट आहे हे लक्षात ठेवावं असा इशारा मराठा समाजाकडून देण्यात येत आहे.
आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आम्ही लढतोय त्यात कुणी स्वतःची पोळी भाजण्यासाठी मराठा आरक्षणाकडे वेगळ्या नजरेने आणि डिवण्याचा प्रयत्न करू नये, नेता मराठा समाजाच्या रुद्र अवताराला सामोरे जावे लागेल तुम्ही ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाला विरोध कराल त्याच पद्धतीने तुम्हाला देखील विरोध केला जाईल असा इशारा देखील मराठा समाजाकडून देण्यात येत आहे. मग त्या ठिकाणी मराठा समाजाचा नेता असो किंवा इतर समाजाचा नेता असो तिथे कुणाचीच गई केली जाणार नाही तुमची भाषा ज्या पद्धतीने असेल त्याच पद्धतीने मराठा समाज सुद्धा उत्तर देईल यातही मात्र शंका उरलेली नाही त्यामुळे आता मराठा समाजाची ही आरपारची लढाई आहे आता जपून बोलावं मग सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल समझनेवाले को इशारा काफी है अशा पद्धतीच्या मराठा समाजातून भावना व्यक्त होत आहेत.
★सोशल मीडियावर व्यक्त व्हा पण जरा जपून!
मराठा समाज त्यांच्या हक्काचं मागतोय कुणाचा हिसकावून घेत नाही किंवा कुणाच्या ताटातलं ही मागत नाही आमच्या हक्काचा आम्ही मागत आहोत त्यामुळे आमच्या हक्काचं मागताना कुणाच्या पोटात दुखायचं अजिबात कारण नाही आम्ही कुणाला त्रास द्यावा ही मराठ्यांची जात नाही पण आमच्या कोणी नादाला लागलं तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल याचाही त्यांनी भान ठेवावा असा इशाराच मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.