★शालेय कुस्ती स्पर्धेत निवड चाचणी ; पै.सतीश शिंदेंकडून कौतुकाची थाप !
आष्टी | सचिन पवार
आष्टी तालुक्यातील शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत जय हनुमान तालीम च्या पाच पहिलवानांची निवड झाली आहे. जय हनुमान तालीम चे संकल्प पै.सतीश आबा शिंदे यांनी निवड झालेल्या पै.सचिन पारखे, पै.प्रदीप तोडकर, पै.विश्वास तावरे, पै.समाधान खवले, पै.सुरज सूर्यवंशी या मल्लांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जय हनुमान तालीमच्या पाच मल्लांची निवड झाली आहे. यामध्ये सचिन अशोक पारखे वजन 97, प्रदीप प्रल्हाद तोडकर वजन 68, विश्वास शहाजी तावरे वजन 41, समाधान सुभाष खवले वजन 48, सुरज विजय सूर्यवंशी वजन 38 वजनी गटांमध्ये या मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यासाठी पुढील दौड सुरू केली आहे. हे सर्व मला जय हनुमान तालीम मधील असल्याने त्यांच्या पाठीवर जय हनुमान तालीम चे संकल्प सतीश शिंदे व वस्ताद सोपान शिंदे व धनंजय खवळे यांच्याकडून कौतुकाची थाप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व स्पर्धकांना देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
★जय हनुमान तालमीचे मल्ल पुन्हा चमकले!
आष्टी तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात अगदीच आजारांना नाव घेतलं जातं ते सतीश शिंदे यांचे त्यांनी स्वतःच क्षेत्र जरी आता राजकारण केलं असलं तरी कुस्तीवरील त्यांचे प्रेम अजूनही कमी झालेलं नाही त्यामुळे त्यांनी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी जय हनुमान तालीमची नवीन उभारणी करून युवकांना घडवण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ तयार करून दिला आहे. आज तालुकास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याकडे घोडदौर सुरू केल्याने जय हनुमान तालीम व वस्ताद सोपान शिंदे व धनंजय खवळे यांचे नाव अधिक प्रकाश स्वतःमध्ये आले आहेत.