14.1 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठ्यांचा बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा पाटोदा तहसीलवर धडकला!

★‘एकच मिशन, मराठा आरक्षण’च्या घोषणा

★महिलांसह मुला-मुलींची लक्षणीय संख्या ; अख्या सोनेगावचं पाटोदा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

पाटोदा | सचिन पवार

एक मराठा मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देत सोनेगाव सौंदाना येथील गावकर्‍यांनी सोनेगाव ते पाटोदा बैलगाडी मोर्चा काढत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. सदरचा मोर्चा हा तहसील कार्यालयावर आल्यानंतर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी मुख्यमंत्री साहेब, तुम्ही बोलून मोकळं व्हायचं म्हणताय, आम्ही निवडणुकीच्या काळात तुम्हाला घरी बसवून मोकळे करू, असा इशारा उपस्थित मोर्चेकर्‍यांनी दिला. या मोर्चामध्ये महिलांसह बालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 17 दिवस सराटे अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे, तो वेळ देत उपोषण मागे घेण्यात आले असले तरी शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण, निदर्शने आणि मोर्चे आजही राज्यभरात चालू आहेत. आज पाटोदा तालुक्यातील सोनेगाव सौंदाना येथील मराठा समाजाने पाटोदा तहसीलवर बैलगाडी मोर्चा काढला. गावातून अनेक जण बैलगाडी, ट्रॅक्टरने पाटोदा शहरात डेरेदाखल झाले. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’च्या घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. सदरचा मोर्चा हा पाटोदा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे रुपांतर नंतर सभेत झाले. या वेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत गरज आहे हे सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब, तुम्ही बोलून मोकळे झालात आणि मराठा समाजाला आरक्षर दिं नाही तर 2024च्या निवडणुकी मध्ये तुम्हाला घरी बसवून आम्ही मोकळे करू, असा सज्जड इशारा मोर्चेकर्‍यांनी दिला. हजारोंच्या संख्येने असलेल्या मोर्चामध्ये अबालवृद्ध मोठ्या संख्येने दिसून येत होते.

★एकच मिशन मराठा आरक्षण च्या घोषणाने पाटोदा शहर दणाणले!

मनोज रंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आमरण उपोषणच्या समर्थनार्थ पाटोदा तालुक्यातील सोनेगाव ग्रामस्थांनी पाटोदा तहसीलवर काढलेला बैलगाडी मोर्चा हा सर्वांनाच लक्ष केंद्रित करणारा ठरला आहे. संपूर्ण गाव महिला मुलं वृद्ध युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आणि पाटोदा शहर एकच मिशन मराठा आरक्षणाच्या जय घोषणा दणाणून निघाले. मराठ्यांचा हा मोर्चा लक्ष केंद्र ठरला आहे.

★मराठा मोर्चा मोरचीकरांनी दिला सरकारला इशारा

मराठा आरक्षणाचा निकाल लवकरात लवकर काढा अन्यथा तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा मोर्चाकरांनी सज्जड इशारा दिला आहे. तुम्ही निवडणुकीच्या आश्वासन देता आणि मराठा समाजाला झुलवत ठेवता तसंच आरक्षणाचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुम्ही जसं बोलून मोकळे होतात तसेच मराठा स्वभाव सुद्धा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत घरी बसून मोकळा होईल यात सुद्धा शंका राहणार नाही त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा निकाल तात्काळ काढावा असा इशारा मराठा समाजाकडून दिला.

★जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत विविध आंदोलन सुरूच!

पाटोदा तालुक्यातील प्रत्येक गावाने संकल्प केला असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत विविध आंदोलन सुरूच राहणार असल्याचा सुद्धा सांगितला आहे. डोंगर किनी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच साखळी आंदोलन स्थगित करून आता त्याच रूपांतर समर्थन आणि सहभाग आंदोलनात करण्यात आले आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहण्याचं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!