12.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाटोदा तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य

★कार्यालयात स्वच्छता न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? – गणेश शेवाळे

पाटोदा | प्रतिनिधी

पाटोदा तहसील कार्यालय इमारत घाणीच्या विळख्यात आली आहे. एकीकडे ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्याचा संदेश देणाऱ्यां अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयात स्वच्छता ठेवाता येत नसल्याचे विदारक चित्र पाटोदा तहसील कार्यालयात दिसून येत आहे. त्यात तहसील कार्यालयाच्या कान्या कोपऱ्यात तंबाखू गुटखा पान खाऊन पिचकार्‍यांनी भिंती लाल रंगलेल्या आहेत.यामुळे
स्वच्छ भारत मिशन अभियानावर शासनाकडून करोडो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. त्यास ग्रामीण भागातील लोकांनी देखील चांगला प्रतिसाद देऊन गाव स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान,शौचालयाचे बंधकाम,गटारमुक्त गाव करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.परंतु तालुक्यातील सर्वात मोठी कार्यालय असलेले तहसील कार्यालयात मात्र कान्या कोपऱ्यात प्रचंड घाण पसरली असून हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार असाच असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या सूचनावरून स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च करुन विविध प्रकारे जनजागृती कार्यक्रम राबविले आहेत. त्यास ग्रामीण भागातील लोकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.परंतु सरकार ज्या अधिकार्‍यांवर ही जबाबदारी सोपविते तेच अधिकारी या स्वच्छतेच्या कामाला हरताळ फासत असल्याचे चित्र पाटोदा तहसील इमारतीच्या काण्या कोपऱ्यात इमारतीबाहेर परसलेल्या प्रचंड घाणीवरून दिसून येत आहे.एकूणच कार्यालयाच्या अस्वच्छतेचा हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार असेच दिसून येत आहे.तहसील, कार्यालायाच्या भिंती पान, गुटख्याच्या पिचकार्‍यांनी रंगलेल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. हीबाब लक्षात घेऊन सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवून पसरलेला घाणीचा विळखा दूर करावा आणि मगचं ग्रामीण भागातील गावकर्यांना आणि जनतेला स्वच्छतेच्या सूचना द्याव्यात अश्या तिखट प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गणेश शेवाळे यांनी दिल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!