★डोंगरकिन्ही येथील मराठ्यांच मराठा आरक्षणासाठी नवीन शस्त्र!
पाटोदा | सचिन पवार
मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सुरू केलेल्या पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील आमरण उपोषण साखळी उपोषणात रूपांतर करून सुरू केले होते आता साखळी उपोषण स्थगित करून समर्थन व उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे.
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे सुरू असलेले मराठा रक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते ते उपोषणा स्थगित करण्यात आले व आज पासून नवीन समर्थन व सहभाग आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी पेटलेला मराठ्यांचा वनवा विझणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी समर्थन आणि सहभाग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात मराठ्यांना मिळणार कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळेपर्यंत हा मराठ्यांचा वनवा असाच भेटत राहणार आहे. मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेला चाळीस दिवसाचा अल्टिमेट संपेपर्यंत आणि मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत डोंगरकिन्हीतील आंदोलन कर्त्यांनी समर्थन आणि सहभाग आंदोलन सुरू करून क्रांतीची ज्योत पेटत ठेवण्याचे काम केले आहे. यावेळी परिसरातील नागरिक आंदोलन करते मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
★डोंगरकिन्हीतील साखळी आंदोलन स्थगित करून समर्थन आणि सहभाग आंदोलन सुरू
मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डोंगर किनी येथे सुरू असलेलं 17 दिवसापासून उपोषण आज स्थगित करण्यात आले व नवीन समर्थन आणि सहभाग आंदोलन सुरू करून मराठ्यांनी पेटवलेली ज्योत ही कायम तेवत ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. लहानापासून थोऱ्यापर्यंत या आंदोलनात सहभागी होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे. या आंदोलनात पाटोदा तालुक्यातील प्रत्येक गाव सहभागी होणारा असून एक तास मराठा समाजासाठी देणार असल्याचे सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
★डोंगरकिन्हीच्या आंदोलकांनी ठरवली पुढील दिशा!
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत डोंगरकिन्हीच्या आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी आपण पेटवलेला आरक्षणाचा वनवा विजू न देण्याचा संकल्प केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समर्थन आणि सहभाग आंदोलन सुरू ठेवण्याचा डोंगरकिन्ही च्या मराठ्यांनी वेड्याच उचलला आहे.