★खरंच हाच आमचा हक्काचा आमदार ; जनतेच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया !
आष्टी | सचिन पवार
आष्टी मतदार संघाचे शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे काका ही नेहमीच आपल्या साधेपणाने चर्चेत राहिले आहेत. जी आपल्याला गोष्ट आवडते ती केलीच पाहिजे हा त्यांचा सांगण्याचा हेतूच आहे असं वाटत आहे. आमदार झालो म्हणून हवेत जायचं नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. कधी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील ढोल वाजवताना तर कधी यात्रेमध्ये नाचताना सुद्धा आपण त्यांना पाहिला आहे. काल परवा तर पोळ्याच्या सणाची खरेदी चक्क पिंपळवंडी तर येथे करताना त्यांना पाहिलं आज घोड्यावरून सवारी करत गावात फेरफटकाच मारला म्हणावे लागेल हाच त्यांचा अंदाज कार्यकर्त्यांना भावला आहे.
नेता जेव्हा आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये येऊन मिसळतो आणि त्यांच्याबरोबरच सर्व गोष्टींचा आनंद घेतो तेव्हा सर्वसामान्य जनता सुद्धा म्हणते हाच तर आहे आमचा हक्काचा आमदार. आमदार बाळासाहेब आजबे काका नेहमीच सर्वसामान्य जनतेमध्ये मिळून मिसळून राहून त्यांच्या समस्या जाणून घेत आणि त्यांना सोबत घेऊन पुढे चाललात असल्याच आपल्याला पाहायला मिळत. त्यांचा साधेपणा हा सर्वसामान्य जनतेला अधिक आपलं करत चालला आहे. बैल पोळ्याच्या सणानिमित्त आमदार साहेबांनी चक्क घोड्यावरून सवारी करत गावात फेरफटका मारला, त्यांचा हटके अंदाज कार्यकर्त्यांना भुरळ पाडत आहे.
★आमदार आजबेंचा फोटो सोशल मीडियावर होते व्हायरल!
आपल्यातील एखादा सर्वसाधारण व्यक्ती मोठ्या पदावर जातो किंवा आमदार होतो तेव्हा आजूबाजूचे सुद्धा भेटताना बोलताना कुजबूज करतात परंतु आमदार बाळासाहेब आजबेंशी बोलताना सर्व कार्यकर्ते त्यांचा मित्रपरिवार अगदी मोकळ्या मनाने आणि सर्वसाधारण चर्चा करताना आपण पाहिला आहे. मित्रांना किंवा कार्यकर्त्यांना आजबे काका नेहमीच पहिल्यासारखाच बोलताना, भेटताना दिसतात आमदार झालो म्हणून तुमच्या पासून दूर जायचं नाही तर अधिक जवळकरून तुमच्या अडचणी सोडवण्याचा विडा उचलला आहे, हाच त्यांचा नेहमी संदेश राहिला आहे.