★सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र जाहीर करण्यासाठी गाव पातळीवर आक्रमकपणा !
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील निवडुंगा व वाहली या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून वाहली व निवडुंगा सीमेवर तीन तास रस्ता रोको करून सरकारचा निषेध नोंदवला आहे आणि अंतरवाली सराटी या गावामध्ये सकल मराठा समाज बांधवांचा प्रतिनिधी म्हणून श्री माननीय मनोज जरांगे पाटील हे गेल्या 16 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत होते त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हा रास्ता रोको केला असं दोन्ही गावातील ग्रामस्थांनी सांगितलं,आणि हा रस्ता रोको झाल्याच्या नंतर दोन्ही गावातील तरुणांनी मोटरसायकल रॅली काढत निवडुंगा चिंचोली चिखली अंतापुर मार्गे मुगगाव या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे त्या उपोषणाला देखील उपस्थिती दर्शवीत तिथून सावरगाव कुसळंब पिंपळवंडी मार्गे डोंगरकिन्ही येथे गेल्या दहा दिवसापासून अन्न त्याग उपोषण करत होते त्या उपोषण स्थळी भेट देऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला.
★मनोज जरांगे सह जिल्ह्यात सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं मनोज जारंगे यांचे आमरण उपोषण आंदोलन प्रत्येक गाव पातळीवर तीव्र स्वरूप घेताना दिसत आहे पाटोदा तालुक्यातील निवडुंगा वाहलीच्या ग्रामस्थांनी तीन तास रस्ता रोको करून सुरू असलेल्या अमरून उपोषणाला पाठिंबा दर्शवला.
★लहान मुलापासून वृद्धांपर्यंत नागरिक आले रस्त्यावर
मराठा आरक्षणाची दाहकता वाढत चालली आहे म्हणून जरांगे यांचा 16 दिवस झालं आमरण उपोषण सुरू आहे महाराष्ट्राच्या सरकारला काहीच देणे घ्यायला उरलेलं नाही अशी सद्यस्थिती दिसत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर लहानापासून वृद्धांपर्यंत नागरिक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत येणारा काळ अतिशय कठीण असल्याने सर्वजण स्वतःची जबाबदारी ओळखून रस्त्यावर उतरू लागले आहेत याची सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही यातील मात्र शंका नाही.