★विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, वारकरी, आराधी मंडळ, शेतकरी बांधवांचा धडकणार मोर्चा !
पाटोदा | सचिन पवार
आंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण अधिक जोर धरू लागले आहे पाटोदा तालुक्यातील सोनेगाव ग्रामस्थांचा भव्य बैलगाडी मोर्चा शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी पाटोदा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये शाळकरी विद्यार्थी महिला वय वृद्ध वारकरी मंडळ आराधी मंडळ तसेच सर्वसामान्य नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभाग होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे.
पाटोदा तालुक्यातील सोनेगाव ते तहसील कार्यालय पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणार्थ मोर्चा म्हणून भव्य बैलगाडी मोर्चा आयोजन केले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील अमरण उपोषण करत आहेत त्यांना समर्थन म्हणून भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले आहे यामध्ये सर्वसामान्य मराठा बांधव शाळकरी विद्यार्थी महिला वयोवृद्ध वारकरी आराधी मंडळ सर्व शेतकरी बांधव या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या मोर्चाचं निवेदन पाटोदा तहसील कार्यालयांच्याकडे सादर करण्यात आले आहे.