9.7 C
New York
Thursday, April 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

गोतस्करांचा सुळसुळाट!

★शिवप्रतिष्ठानचे प्रमुख पांडुरंग भोसले यांच्यामुळे 100 प्राण्यांसह लाखोंचा मध्यमात जप्त!

★जामखेड-पाटोदा-आष्टी परिसरात गोतस्करांना कायद्याची भीती नाही का ?

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील खर्डा शहरालगत असलेल्या जातेगांव फाटा व जामखेड शहरातील कुरेशी मोहल्ला या ठिकाणी एकाच वेळी आज पहाटे महाराष्ट्र प्राणी संरक्षण व प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायद्या अंतर्गत मोठी पोलीस कारवाई करण्यात आली असून दोन वाहने व कत्तलीसाठी जाणाऱ्या ३ ते १५ दिवसांचे वय असलेली १०० पेक्षा जास्त लहान मोठ्या जनावरांसह ९ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
आज शिवशंकर स्वामी मानद पशु कल्याण अधिकारी यांनी फोनवरून दिलेल्या माहितीवरून दि. १० रोजी पहाटे ५:३० वाजताचे सुमारास काही लोक दोन वाहनांमधून बीड जिल्ह्य़ातील खडकत ता. आष्टी येथून उस्मानाबाद येथे ही जनावरांची तस्करी करत होते. सदरील गाडी मध्ये गोवंशांच्या तोंडाला चिकट टेप लाऊन तसेच त्यांचे तोंड दोरीने बांधून अत्यंत क्रूरपणे सर्व वंश गाडीत एकावर एक कोंबून बांधलेली आढळली व त्यातील काही गोवंशाच्या मानेवर वार देखील केलेल आढळले गाडीतील काही गोवंश मेलेल्या स्थितीत आढळुन आले. सदरील गो तस्करांना मोठी कारवाई करत खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल शेषराव निवृत्ती म्हस्के यांच्या फिर्यादीवरून मुजीब नजिर कुरेशी (वय ४०) रा.कब्रस्तान, व साजिद सिकंदर शेख (वय ४०) रा.कुरेशी मोहल्ला, खडकत ता.आष्टी जि.बीड, मतिन बाबु बेग (वय ४३) रा.नवि भाजी मंडई, बशीर गंज रोड, बीड व समिर कलिंदर पठाण (वय २८) वर्ष रा.झोपडपट्टी, खडकत ता.आष्टी जि.बीड यांचे विरुद्ध ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. व्ही. शेंडे हे करत आहेत.
जामखेड तालुक्यात दिवसेंदिवस गो तस्करांचा सुळसुळाट वाढत आहे, गो तस्करांना कायद्याची भिती राहीलेली नाही असेच आजच्या घटनेवरून दिसत आहे. प्रशासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष घालून याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे तसेच ही सर्व पकडलेली गो वंश जतन करण्यासाठी समाजातील गो प्रेमींनी संबंधीत गो शाळेला मदत करावी असे आवाहन केले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुराजे मधुकर भोसले तसेच गोरक्षक योगेश सुरवसे बबलु गोलेकर गणेश ढगे बबलु निकम तसेच मानद पशु कल्याणचे शिवशंकर स्वामी व त्यांचें सहकारी व श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

★गोरक्षक पांडूरंग भोसले मुळे झाली कारवाई!

या बाबत गोरक्षक पांडुरंग मधुकर भोसले यांनी जामखेड व खर्डा पोलीसांना दिलेल्या बातमीवरून खात्री झाल्याने खर्डा पोलीसांच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली आहे. सदर ताब्यात घेण्यात आलेली जनावरे संगोपनासाठी गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!