★संविधानाने दिलेल्या अधिकारापासूनच मराठा समाजाला वंचित ठेवले जातयं!
★राज्यकर्त्यांना आता महागत पडेल – भाई विष्णुपंत घोल
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा(कुणबी) आरक्षणा संदर्भात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत स्वातंत्र्य पुर्व ते आत्तापर्यंत मराठा समाज शेती व शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये गुंतला आहे. शेती व्यवसाय हा सध्या तोट्यातील उद्योग असल्यामुळे कित्येक मराठा शेतकऱ्यांनी कर्ज बाजारी पणाला कंटाळुन आत्महत्या केलेल्या आहेत. लोकसंख्येचा विचार करता उच्च शिक्षण व शासकीय नौकरी मध्ये मराठा समाज दुर लोटला जात आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात तो समाज व्यवस्थेतुन हद्द पार होत चालला असुन शेतीच्या उत्पादन खर्चाचा विचार केला तर शासनाचा आजचा हमीभाव हा शेतकऱ्यांना मुदलात तोटा असल्यामुळे मराठा समाज आर्थिक विषमतेच्या चक्रयुहात अडकला आहे. त्याला उद्योग धंद्यासाठी बँका नाकारत आहेत. कारण त्यांची आर्थिक पत बँकामध्ये नाही त्याला आता आरक्षण देणे शासनाचे कर्तव्य असुन मराठा (कुणबी) समाजाला समानतेच्या अधिकारापासून दुर ठेवल्यास महाराष्ट्रात श्रीमंत विरुध्द गरीब असा लढा चालु होईल त्यामुळे महाराष्ट्रात यादवी युध्द सुरु होईल ते कोणत्याही राज्यकर्तांना महागात पडेल.
मराठा (कुणबी) समाजाबरोबरील असणारा धनगरसमाज, माळी समाज, वंजारा समाज, कोकणातील अग्री समाज आणि विदर्भातील कुणबी समाज हा ओबीसीचे आरक्षण उपभोगत आहे परंतु मराठा समाज संवीधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारापासून दुर लोटल्या जात आहे. एका बाजुला महाराष्ट्र हा शिव,फुले,शाहु ,आंबेडकर आणि आण्णाभाऊ यांच्या नावाने ओळखला जातो. त्या महापुरुषांना समानता अभिप्रेत होती परंतु जाणीव पुर्वक शेतीमध्ये कष्टकरणारा,ऊसतोड मजुर,हमाली करणारा माथाडी कामगार मिळेल तेथे रोजंदारीवर काम करणारा, अल्पभुधारक, भुमिहीन यांना आत्तापर्यंत आरक्षणाच्या हक्कापासून राज्यकर्तांनी दुर ठेवले आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणामध्ये आत्तापर्यंतच्या राज्यकर्ताबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे.जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा कुणबी आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला सुरवात केल्यानंतर दिवसेदिवस महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धग वाढत चालली आहे. राज्यकर्तांनी काही समाजाला आरक्षणाचे कवच देवून मराठा समाजाला संविधाने दिलेल्या समानतेच्या हक्कापासून दुर ठेवणे आता शक्य नाही. नसता मोठ्या उद्रेकाला राज्यकर्ते आमंत्रण देत आहेत त्यासाठी मा.मुख्यमंत्री यांनी तात्काळ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे लेखी आश्वासन देवुन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण व महाराष्ट्रातील आंदोलन थांबवावे असे लेखी निवेदनाव्दारे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा ता.पाटोदा जि.बीड यांचे मार्फत कळविले आहे.
★शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राज्यकर्त्यांकडून मराठा समाजावर अन्याय!
छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मांना समान वागणूक मिळावी यासाठी संविधानात अधिकार दिला असताना देखील जाणीवपूर्वक राज्यकर्त्यांकडून मराठा समाजाला त्रास दिला जात आहे. राज्यकर्त्यांकडून मराठा समाजावर होत असलेला अन्याय आणि समाजात वाढत चाललेली नाराजी त्याचं रूपांतर अधिक तीव्र होऊन भयान स्वरूप घेऊ शकतं त्यामुळे राज्यकर्त्यांनी तात्काळ मराठा समाजावरील अन्याय दूर करून आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.