मराठा समाजाचा हक्काचं खाणारे आरक्षण कसे सोडतील ?
★सरकारने या दोन्ही बाजूचा विचार करावा आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे – मराठा सेवक किशोर पिंगळे
बीड | प्रतिनिधी
गेले 70 वर्षापासून मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण खाऊन ढेकर देणारे आज मराठ्यांना आरक्षण न मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. आपण खातो कुणाचं आणि बोलतो कुणाला याचं तरी भान ठेवा. एका कागदावर आरक्षण मिळवणारे आज मराठ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची भाषा करतात हे आता मराठा समाज खपून घेणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने वागतात बोलतात त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर दिला जाईल असा कडक इशारा मराठासेवक किशोर पिंगळे यांनी पत्रकार दिला आहे.
ओबीसी समाजातील काही समाजकंटक नेतेमंडळी ओबीसी समाजाबरोबर मराठा समाजाचा सुद्धा वापर करून घेतात आणि समाजात समाजामध्ये भांडण लावतात सर्वसामान्य मराठा आणि ओबीसी समाजाला नेत्यांचे अजिबात देणं घेणं उरलेले नाही. नेतेमंडळींनी थोडा विचारपूर्वक वक्तव्य करावेत अन्यथा त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिले जातील. मराठा समाजाच्या आता जीवनमरणाचा प्रश्न आहे त्यामुळे ओबीसी समाजातील काही नेत्यांनी जे भरळ ओळखण्यास चालू केला आहे त्यांनी तात्काळ थांबवावे अन्यथा त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल. आता मराठा समाज शांत तर बसणारच नाही परंतु चाललेल्या लढाईत दूषितपणा आणणाऱ्या नेत्यांना कदापि सोडणार नाही मग तो मराठ्यांचा असेल किंवा ओबीसीचा असेल याची त्यांनी खबरदारी घ्यावी अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील असा कडक इशारा मराठा सेवक किशोर पिंगळे यांनी दिला आहे.
★सत्तर वर्षापासून आरक्षण घेणारा समाज अजूनही मागासलेलाच मग मराठा समाज कसा सक्षम ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना न्याय मिळावा यासाठी राज्यघटनेत आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत परंतु त्याचा सध्याचे नेतेमंडळी गैरवापर करून स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करताना दिसत आहेत मागासले पण दूर झालेलं सुद्धा दाखवायला तयार नाहीत आणि जो मागासला आहे ते दाखवायला पण तयार नाही. स्वतःच्या स्वार्थापायी समाजाला भेटीस धरण हे योग्य नाही. ज्या समाजाला 70 वर्षापासून आरक्षण आहे तो अजूनही मागासलेलाच आहे मग ज्या मराठा समाजाला 70 वर्षापासून आरक्षणाच नाही तो सक्षम कसा असेल असाही सवाल मराठा समाजातून उपस्थित होत आहे.
★इतर समाजाचा दोष करून आम्हाला मोठे व्हायचं नाही त्यांनाही सोबत घेऊन पुढे चालायचं…
दुसऱ्याचा दोष करून आपण चांगलं दाखवण्याचा कधीही प्रयत्न मराठा समाजाने केलेला नाही त्यामुळे दुसऱ्या समाजाचे घेऊन आम्हाला आमचं चांगलं करायचं हे तर आमच्या रक्तातच नाही त्यामुळे आमच्या हक्काचे आहे तेच आम्ही मागत आहोत आणि ओबीसी मधून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हे पहिल्यापासूनच असल्यामुळे ती आमची मागणीच आहे आणि तीच आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असा मराठा समाजाकडून ठणकावून सांगितलं जात आहे.
★सत्तर वर्ष मराठ्यांनी सर्व नेत्यांची मान उंचावली आता मराठा समाजाची मान उंचावण्याची जबाबदारी नेत्यांची
गेल्या 70 वर्षापासून मराठा समाज सर्व पक्षातील नेत्यांची मान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आलेला आहे आज मराठा समाजाला त्यांच्या हक्कासाठी लढावे लागते हे दुर्दैव आहे पण आता सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन मराठा समाजाची मान उंचवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच अपेक्षा आहे अन्यथा जशी मान उंचावली तशी खाली सुद्धा घेण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे हेही लक्षात ठेवावे..
★आता आरपारचीच लढाई होणार
मराठा समाज आत्तापर्यंत संयमाने आरक्षणाच्या मागणीसाठी लढला आहे. अनेक मराठा बांधवांनी बलिदान देऊन सुद्धा आरक्षणाच्या मागणीत लढा दिला आहे. आता यापुढे एकाही मराठा बांधवाचं बलिदान जाणार नाही याची जबाबदारी मराठा समाजाने घेतली आहे. यापुढे आरक्षणासाठी गरज पडली तर नेत्यांचे बलिदान जाईल परंतु समाजाचा नाही हे देखील सगळ्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे..
★मनोज जरांगेंच्या जीवालाच काही झालं तर महाराष्ट्र पेटेल!
आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसलेली मनोज जरांगे यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटल यातील मात्र शंका नाही. त्याला संपूर्ण जबाबदार महाराष्ट्र सरकार असेल आणि संपूर्ण नेतेमंडळी असतील याचीही सर्वांनी दखल घ्यावी. कारण की आता मराठा समाजाचा सहनशीलतेचा अंत संपलेला आहे…