पोलखोल!
छातीवर हात ठेवून
खरंच बोलणार आहे
तथाकथित नेत्यांची
पोल खोलणार आहे.
आरक्षणाच्या प्रश्नांवर
भाकरी यांना भाजायचीय
आपापल्या पक्षश्रेष्ठींची
मर्जी यांना राखायचीय.
मोर्चे अन दौरे
लई झाले तुमचे
फेसबुकवर फोटो पाहून
डोळे शिणले आमचे.
खरं आरक्षण मागायला
ह्रदयात हिंमत लागते
स्वतःच्या राजकीय भविष्याची
भीती यांना वाटते.
तुमचा दळभद्री पणा
समाजाच्या मुळावर आलाय
गलितगात्र झालेला समाज
पुरता गळून गेलाय.
असेल तुम्हांला कळवळा
एकत्रित मिळून लढा
आरक्षणाच्या प्रश्नांवर
सनदशीर मार्ग काढा.
– प्रा.पंजाबराव येडे