★पाटोदा तालुक्यात दौऱ्यावर आमदार साहेबांचं साधीपणाचे दर्शन !
पाटोदा | सचिन पवार
आमदार बाळासाहेब आजबे काका हे नेहमीच जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे आमदार म्हणून ओळखले जातात सर्वसामान्यांची प्रश्नांची त्यांना जाण असल्याने शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमकपणे आपले मुद्दे देखील मांडतात. हीच त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या अधिक साधेपणाचे लक्ष दर्शन पाहायला मिळालं. पाटोदा तालुक्यात दौऱ्यावर असताना पिंपळवंडीत बैलपोळ्या निमित्त सजलेले दुकान पाहून त्यांनी गाडी थांबून बैलपोळ्याच्या सणाची खरेदी केली. आमदार बाळासाहेब आजबे यांचा हा साधेपणा सर्वांनाच भावला आहे.
पाटोदा तालुक्यातील अश्वलिंग देवस्थानच्या दर्शनासाठी बाळासाहेब आजबे आले होते पिंपळवंडीत परतताना बैलपोळ्याच्या सणानिमित्त सजलेले दुकान पाहून त्यांचे देखील मन आवरलं नाही आणि गाडी थांबून त्यांनी आपल्या सर्जा राजासाठी पिंपळवंडी तेच खरेदी केली हाच आमदार बाळासाहेब आजबे काकांचा साधेपणा सर्वसामान्य जनतेला कार्यकर्त्यांना नेहमीच आपलंसं करत आला आहे. नाऱ्या काळात देखील आजबे काकांचे हेच साधेपण दिसत राहो हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी कार्यकर्त्यांकडून होत आहे, कारण की आमच्या हक्काचे आमदार फक्त काकाच आहेत असं जनतेला वाटतं म्हणूनच जनतेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काकाकडूनच आहेत.