★मराठा आमदारांनी भुमीका स्पष्ट करावी : आप्पासाहेब जरे , अनिल डोके
आष्टी | प्रतिनिधी
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलकांवर पोलीसाकडून अमानुष लाठीचार्ज करून येथील आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासन यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आल्यानंतर अमानुष लाठीचार्ज व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अन गावागावात गेल्या बारा तेरा दिवसापासुन मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज बांधवाकडून आपपोल्या पद्धतीने आंदोलन करतांना दिसत असून मराठा समाज बांधवांच्या जिवावर ज्या मराठा आमदारांनी आमदारकी मिळवली त्या मराठा समाज आरक्षण प्रश्नावर राज्यातील सर्व मराठा आमदारांनी मौन बाळगले असल्याचे पहावयास मिळत असल्याने त्यांच्याप्रती प्रेम, आदर, जिव्हाळ्याचे रूपांतर व्देशात झाले असून त्यांच्याप्रती मराठा समाज बांधवाकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत असून मराठा आमदार हे खरचं मराठा आहेत का याविषयी शंका उपस्थित होऊ लागली आहे तसेच मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आमदारांनी भुमीका स्पष्ट करावी अशी मागणी मातकुळी येथे चालू असलेल्या आमरण उपोषण आंदोलन स्थळावरून आमरण उपोषणकर्ते मातकुळी येथील माजी सरपंच आप्पासाहेब जरे व अनिल डोके यांनी केली आहे.
राज्यातील कानाकोपऱ्यात मराठा समाज बांधव आपल्याला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत आहेत. त्यातच काही ओबीसी समाजाच्या नेत्याकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करीत असून सरकारलाही इशारा देत आहे. तसेच काही ओबीसी नेते मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची भाषा करीत आहेत. मात्र स्वताच्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जिवाचीबाजी लावणार्या मनोज जरांगे पाटील यांना जर काही मगरूर लोक अटकेची मागणी करत असतील तर मराठा समाजाच्या आमदारांनी मौन का बाळगले आहे ते सांगावे तसेच आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मातकुळी येथील आंदोलन स्थळावर आंदोलक व मराठा समाज बांधवाकडून होत आहे. तसेच ओबीसी नेते स्पष्ट शब्दात ठणकावून मराठा आरक्षणाला विरोध करतात आणि मराठा समाजाचे आमदार मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. तेव्हा मराठा समाजाच्या आमदारांनी आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी नसता मराठा समाज बांधव योग्य तो निर्णय घेतील असे सांगण्यात आले आहे.
★मराठा आमदारांचं मन सर्वसामान्य मराठा समाजासाठी घातक!
मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलना उपोषणा करत असताना मराठा समाजाचे आमदार मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. मराठा समाज अतिशय तीव्र समस्यांना तोंड देत असताना मराठा समाजाच्या जीवावर स्वतःची टिमकी वाजवणारे मराठा आमदार यांनी मोहन धारण केल्याने समाजाची अवस्था खूप बिकट होत चालली आहे. मराठा समाज येणाऱ्या काळात मराठा आमदारांना योग्य जागा दाखवतील यातही तीळ मात्र शंका उरलेली नाही.