19.1 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकऱ्यांचा आक्रमक चेहरा पूजा मोरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!

★खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश सोहळा

★स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकत पूजा मोरे समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल

बीड | सचिन पवार

खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची नुकतीच बीड येथे झालेली विराट सभा नक्कीच बीड जिल्ह्यातून बऱ्याच नेत्यांना आपलंसं करणारी ठरली आहे. लागलीच घेवराई तालुक्यातील प्रवेशाचा सत्र सुरू झालं. गेवराई तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी आज त्यांचा समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे व शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या असंख्य समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूजा मोरे यांचे कौतुक करत पुढे त्या प्रत्येक कार्यक्रमात दिसतील त्यांना बळ दिले जाईल असे सांगितले. यावेळी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अमोल कोल्हे, रोहित पवार, राजेश टोपे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रक्षा खडसे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.

★चांगलं काम करणाऱ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची साहेबांना पारख – राजेश टोपे

बीड जिल्ह्यामध्ये पूजा मोरे ही लढवय्या आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीची आवड तसेच शेतकऱ्यावर होणारा अन्याय तिला सहन होत नसल्याने ती आक्रमक म्हणून पुढे आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी पूजाचा राजकारणातील सहभाग गरजेचा आहे. मराठवाड्यातील चांगल्या वक्त्या म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे साहेबांच्या नजरेतून पूजा मोरे चुकल्या नाहीत स्वतः त्यांना साहेबांनी बोलावून घेत परिवारासह चर्चा केली, आता प्रवेश करून त्या मुख्य प्रवाहात आल्या असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

★शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई कायम सुरू राहील – पूजा मोरे

सर्वसामान्य कुटुंबातील गोदाकाठची ही बहीण पुढे जावी म्हणून सर्वांनीच प्रयत्न केले. माझ्यासाठी शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य बांधवांनी रक्त सांडले लाठ्याकाठ्या खाल्ल्या आज त्यांच्या समोर नतमस्तक होते. मी सुद्धा वडापाव, ठेचा, भाकर खाऊन प्रवासात पेट्रोल पंपावर सुद्धा झोपून शेतकऱ्यांसाठी लढाई लढले, यापुढेही लढाई सोडणार नाही आणि लोकशाहीच्या मंदिरात शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न करत राहील. येणाऱ्या संकटाचा सामना करत काट्याकुट्याची वाट सोडायची नाही आपल्या बळीराजाचा आवाज व्हायचा आहे. शरद पवार साहेबांचे मोरे कुटुंबावर कायम उपकार आहेत ते उपकार फेडण्याची हीच वेळ असल्याचेही मोरे म्हणाल्या तसेच लेकीचे भाषण सुरू असताना बापाच्या डोळ्यात पाणी पाहिले आणि त्याच क्षणी ठरवलं की या बापासाठी लढायचं शेतकऱ्यांचा आवाज शरद पवार साहेबच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याच्या भावना देखील पूजा मोरे यांनी व्यक्त केल्या..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!