★मराठा बांधवांचा आक्रमक पवित्र सोमवारपासून शाळा बंद चा पवित्र!
पाटोदा | सचिन पवार
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण अधिक तीव्र होत चालले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ डोंगर किनी येथे सुरू असलेलं आमरण उपोषण त्या उपोषणकर्त्यांची प्राकृति खालावली असून आता गावातील नागरिकांनी एकत्रित येत सोमवारपासून शाळा बंद ची हात दिली आहे.
मराठा आरक्षणाचा तोडगा निघत नसल्याने आणि आंदोलकांची प्रकृती खालावत असल्याने गावातील नागरिकांनी आता शाळा बंदची हाक दिली असून नंतर संपूर्ण शासकीय कार्यालय बंद करण्याची सुद्धा तयारीत आहेत. आंदोलन कर्त्याकडे प्रशासनाचे झालेलं दुर्लक्ष आणि आंदोलकांची कृती खालावत चालल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. आंदोलन करताना जर काही झालं तर याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिला आहे. आता काही मराठा बांधवांची बलिदान जाणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अन्यथा शासनाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणीच घेणार नाही असा देखील इशारा देण्यात आला आहे.
★डोंगरकिन्हीत सोमवारपासून शाळा बंदच्या तयारीत!
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बसलेल्या डोंगरकिनेतील आंदोलकांची प्रकृती खालावत चालल्याने डोंगर किनी तील मराठा बांधवांनी अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासून शाळा बंद करण्याच्या तयारीत असल्याचा सुद्धा सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा सुद्धा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांकडून असं कळविण्यात आले आहे.
★आमच्या मराठा बांधवांचा जीव गेल्यास मराठ्यांचा रुद्र अवतार दिसेल
डोंगर किनी येथे सुरू असलेलं मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अन्यथा आंदोलन आणि त्या ठिकाणी बसलेल्या आंदोलकांची प्रकृती अतिशय खालावली असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचा वातावरण आहे. पासून शाळा बंदची हाक देण्याच्या तयारीत असून आंदोलकाच्या जीवाला धोका झाल्यास प्रशासनाने मराठ्यांच्या रुद्र अवतारात सामोरे जावे लागेल असा इशारा देखील देण्यात आला आहे.