मराठ्यांनी ठरवलंय ; नाकावर टिचून आरक्षण
मिळवायचं !
★मराठा नेत्यांनो तुमची भूमिका स्पष्ट करा ; सकल मराठा समाजाची मागणी
★निवडणुकीत मराठा समाज ठरवणार काय करायचं ; घोडे मैदान जवळच!
[ मराठा आरक्षणाला विरोध करणारी ओबीसी नेत्यांचं मराठ्यांची तोंडावर बोट ठेवून बसलेल्या नेत्यांचा योग्यवेळी कार्यक्रम होईल ? ]
बीड | सचिन पवार
सध्या मराठा आरक्षणाचा राजकारण तापलं असताना ओबीसी नेते छगन भुजबळ पंकजा मुंडे नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाला पोस्ट विरोध करत त्यांची भूमिका पोस्ट केली आहे परंतु सर्वसामान्य ओबीसी समाजाचा मात्र मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचा सुद्धा स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावामध्ये सुरू असलेलं उपोषण हे मराठा आरक्षणाला दिशा देणारा ठरत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघण्याच्या मार्गावर येतात ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध करत भूमिका स्पष्ट केली मात्र मराठा समाजाच्या नेत्यांनी मात्र तोंडाला कुलूप लावलेलं चित्र स्पष्ट दिसत आहे.
मराठा समाज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून न्याय मागत आहे मात्र ओबीसींचे नेते चांगला विरोध करताना दिसत आहेत त्यात मराठा समाजाचे नेते मात्र तोंडाला कुलूप लावून शांत बसलेल्या सुद्धा दिसत आहे. सर्वसामान्य मराठा समाज हक्कासाठी आरक्षण मागतोय तर सर्वसामान्य ओबीसी समाज मात्र आरक्षणाला जाहीर पाठिंबा देत आहे. पण ज्या नेत्यांची समाजाच्या नावावर पोळी भाजत आहे ते मात्र कडाडून विरोध करत आहेत तर काहींनी तोंडाला कुलूप लावून चक्क बसले आहेत. या सर्वाचा हिशोब सर्वसामान्य मराठा समाज येणाऱ्या काळात घेतल्याशिवाय राहणार नाही अशा सुद्धा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत.
★मराठा नेत्यांची हाताची घडी तोंडावर बोट!
मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय तीव्र झाला असला तरी मराठा नेत्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवत आपली भूमिका स्पष्ट करायला सध्या तरी नाकार दिला आहे. ओबीसी चे नेते मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करताना दिसत आहेत.
★ओबीसी नेत्यांचा मराठा आरक्षणाला पोस्ट विरोध!
सर्वसामान्य ओबीसी समाजाकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळत आहे तर ओबीसींचे नेते छगन भुजबळ पंकजा मुंडे नाना पाटोळे यांनी मराठा आरक्षणाला पोस्ट विरोध केला आहे. यावरून एक स्पष्ट होत आहे की ओबीसी नेत्यांना त्यांची पोळी भाजण्यासाठी मराठा आरक्षणाला विरोध करत आहे हे स्पष्ट झाले आहे. समाजात समाजामध्ये वाद लावण्याचे काम सुद्धा नेतेमंडळी करताना दिसत आहे. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
★ओबीसी नेत्यांना व मराठा नेत्यांना मराठ्यांचे मत नकोत का ?
निवडणुका आल्या की ओबीसींचे नेते आणि मराठ्यांचे नेते ज्या पद्धतीने मतासाठी भीक मागतात आणि मराठ्यांच्या हक्काचं द्यायचं म्हटलं की कडाडून विरोध करतात आता हे सर्व मराठा समाजाच्या लक्षात आले असल्याने येणाऱ्या काळात त्याचा पूर्ण हिशोब मराठा समाजाकडून केला जाईल यातील मात्र शंका नाही.