सौ.सत्यभामा बांगर यांना एबीपी माझा कडून महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार प्रदान !
मुंबई : वृत्तांत
गेल्या अनेक वर्षापासून महिलांचे सक्षमीकरण महिलांचे संघटन व निराधार ,अपंग, विधवा, यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व कुटुंबातील संसाराचा गाडा चालवण्यासाठी आधार देण्याचे काम प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. सत्यभामाताई रामकृष्ण बांगर यांच्या कार्याची एबीपी माझा न्युज या वृत्तवाहिनीने दखल घेऊन त्यांना महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार देऊन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजु खांडेकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
हॉटेल कोर्टयार्ड अंधेरी पूर्व येथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले बद्दल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एबीपी वृत्तवाहिनीचे विशेष कार्यकारी संपादक राजु खांडेकर होते .यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राचे अनमोल रत्न यांची कामगिरी उद्योग क्षेत्रामध्ये पुरस्कार दिलेल्या व्यक्तींना उद्योग महाराष्ट्रात कसा वाढवता येईल आणि महाराष्ट्र राज्य हे देशांमध्ये उद्योग क्षेत्रात कसे पुढे जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. राजु खांडेकर यांनी महाराष्ट्र राज्य सर्वांगीण क्षेत्रामध्ये पुढे कसे जाईल व देशात नंबर वन कसे राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे.यावेळी सहकार महर्षी रामकृष्ण बांगर, इंजि. दीपक सारूक, जागृती सारुक, प्राचार्य तुकाराम तुपे , सेवा सहकारी संस्था पाटोदा संचालक- साजेद सय्यद सह अनेक पुरस्कार प्राप्त मान्यवर यावेळी उपस्थित होते.