5.1 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

मनसेने कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीची घातली अर्ध नग्न महापूजा!

★निकृष्ट कामे व टेक्नीकल गैरप्रकारांची त्रयस्थ विभागीय चौकशी करा

पाटोदा | प्रतिनिधी

आष्टी -पाटोदा- शिरूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरकारभारांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी यापूर्वी डोंगर किनी पिंपळवंडी अमळनेर प्रमुख राज्य क्रमांक 16, पुरहानी, वांजरा फाटा ते कुसळंब रस्ता, पशुवैद्यकीय दवाखाना आष्टी, पैठण रस्त्यावरील भावी पुल, शाखा अभियंता म्हणतो कागदपत्रे कामे झाली अशा अनेक प्रकारच्या निवेदनाद्वारे तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिलेले होत्या परंतु यावर कसलीही कारवाई न झाल्याने यापूर्वी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर निवेदन डकवून तसेच झिरमिळ्यां आंदोलन करून यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला होता परंतु तरीही वरील पत्रांवर कोणतीही कारवाई न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेने जिल्हाध्यक्ष दरेकर यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीची महापूजा करून आंदोलन केले आता तरी अशा आंदोलनाची सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यकारी अभियंत्याला याची जराशी काही वाटत असेल तर या गैरप्रकारांची व निकृष्ट कामांची त्रयस्थ विभागीय गुण नियंत्रण पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे नसता यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष अशोक सुरवसे, तालुकाध्यक्ष सोपान मोरे, तालुकाध्यक्ष संजय फरताडे, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र गरजे, रमेश केंद्रे आधी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!