देवा मराठा आरक्षणाला पावशील का ?
आता तरी देवा आम्हाला पावशील का?
ओबीसीमधून आरक्षण द्यायला लावशील का?
मुलांच्या भविष्याची चिंता मनी करी खळबळ
संपकऱ्यामध्ये आलयं मारुतीचं बळ
लढ्यासाठी मदतीला धावशील का?
ओबीसीमधून आरक्षण द्यायला लावशील का?
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार दूर पळते
आंदोलन स्थगित करण्याकडे पाऊल त्याचं वळते
सत्तेतल्या सरकारला सद्बुद्धी देशील का?
ओबीसीमधून आरक्षण द्यायला लावशील का?
दिले निवडून जरी आम्ही गडी
इतरांचं भल करण्यात पडल्यात त्यांच्या उडी
भलं आमचं करण्याला सांगशील का?
ओबीसीमधून आरक्षण द्यायला लावशील का?
पन्नास टक्काबाहेरचं आरक्षण तुम्ही लागू केले
तुमची मानसं त्याच्याविरोधात कोर्टात गेले
आता त्यांना गप्प बसायला सांगशील का?
ओबीसीमधून आरक्षण द्यायला लावशील का?
बरेचं मराठा बांधव आतापर्यंत देवाघरी गेले
सरकारने त्यांच्या घरच्यांना काय दिले
मदत त्यांना करायला सांगशील का?
ओबीसीमधून आरक्षण द्यायला लावशील का?
– श्री.भराटे सर जि.प.प्रा.शाळा वसंतवाडी, ता.पाटोदा जि.बीड.