★मराठा आरक्षणाच्या लढ्याला गावोगावी पाठिंबा ; वाहनांच्या दुतर्फा रांगाच रांगा !
कुसळंब | प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा पुढे सरसावला असुन ७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या चक्का जाम आंदोलनाला बीड जिल्यातील शेकडो ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.रस्त्याच्या दोन्ही बाजुने रांगाच रांगा दिसुन आल्या.
सकाळी दहा ते बारा असे तीन तास जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद राहिले. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही, पिंपळवंडी, पांढरवाडी फाटा ,लिंबादेवी फाटा आदी ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलन दरम्यान आनेकांनी संतप्त भावना व्यक्त करीत जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.सरकारवर देखिल संताप व्यक्त करीत ,आंदोलन करताना अंतरवालीतील समाजबांधवांना लक्ष करीत लाढीमार करण्यात आला, गोळीबार करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा तिव्र निषेध करीत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.एक मराठा ,लाख मराठा आदी घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जोपर्यंत मनोज जरांगे यांचे उपोषण चालू आहे तोपर्यंत त्यांना पाठींबा ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. लोकप्रतिनिधींना निवडणूकीत योग्य जागा दाखवुन देऊत असेही आंदोलक बोलत होते. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखिल अनेक गावे घेणार आहेत. तसेच यापुढे आरक्षण मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना देखिल शाळेत न पाठविण्यासाठी विचारविनिमय चालु असल्याचे सांगण्यात आले.डोंगरकिन्ही येथे सहा समाजबांधवांनी उपोषण सुरु केले आहे. त्यामध्ये आर.आर . येवले,प्रभाकर येवले,कल्याण मळेकर,सुनील मळेकर,दत्ता येवले,प्रशांत येवले यांचा समावेश आहे. येथील उपोषणाला परिसरातील मराठा समाज बांधव उपस्थित राहुन पाठिंबा देत आहेत.जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालुच राहील असे सांगुन यापुढे सरकारने समाजाचा अंत पाहु नये नसता काय घडेल हे सांगता येणार नाही ,त्यामुळे वेळ काढु धोरण न करता तातडीने आरक्षणाचा आदादेश काढावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.या वेळी मोठ्या संख्येने मराठा समाज आंदोलनात सहभागी झाला होता.