★ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि युवकांच्या साथीने जोमाने काम करू – रुपेशराजे बेदरे
मुंबई : वृत्तांत
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते व युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री.सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने तसेच कृषिमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब , आ.बाळासाहेब काका आजबे यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी बीड जिल्ह्यातील धडाडीचे कार्यकर्ते तथा माननीय ना.अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक रुपेश राजे बेदरे पाटील यांची निवड करुन बुधवारी मुंबई येथील पक्ष कार्यालयात पक्ष श्रेष्ठींच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
रुपेश राजे बेदरे पाटील हे बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील रहिवासी आहेत. युवकांच्या गळ्यातील ताईत ठरलेले लोकप्रिय युवा कार्यकर्ते म्हणून त्यांची थेट निरगुडी पाटोदा बीड ते मुंबई अशी ओळख आहे. गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे रुपेश राजे बेदरे पाटील हे पवार कुटुंबीयांच्या सुखदुःखात गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत निष्ठेने काम करणाऱ्यापैकी एक आहेत. एकूणच, त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आणि मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे.दरम्यान, या नियुक्तीनंतर महाराष्ट्राच्या विविध भागासह, मराठवाडा व बीड जिल्ह्यात युवक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. मराठवाडा रहिवासी संघाच्या वतीने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या पक्ष वाढी साठी आपण आणखी यापुढे जोरदार परिश्रम सूरू ठेवावेत, असे आदेश नियुक्त पत्र देऊन माननीय अजितदादा पवार यांनी रुपेश राजे बेद्रे यांचे अभिनंदन केले आहे.नूतन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रुपेश राजे बेद्रे यांचे येत्या दोन दिवसात बीड जिल्ह्यात आगमन होणार असून स्वागतासाठी कार्यकर्ते अतुर आहेत. दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी आपण यापुढेही एक कार्यकर्ता म्हणून अत्यंत निष्ठा आणि प्रामाणिक पणे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अत्यंत दमदारपणे करू.. असा खंबीर विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
★सर्वांच्या सहकार्याने कार्यकर्त्यात ऊर्जा निर्माण करू – रुपेशराजे बेद्रे
पक्षश्रेष्ठीने माझ्यावर टाकलेला विश्वास त्याला तडा न जाऊन देता सर्वांच्या सहकार्याने कार्यकर्त्यात ऊर्जा निर्माण करून पक्ष वाढीसाठी, युवकांच्या संघटन वाढीसाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करू. सर्वांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद खूप खूप आभार..
– रुपेशराजे बेद्रे पाटील
नूतन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य.