★अनाथा मराठ्यांच्या नेत्यांचं फिरणं मुश्किल करू – किशोर पिंगळे
★मनोज जरांगेच्या समर्थनार्थ व कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी तीव्र निषेध!
बीड | प्रतिनिधी
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा समाजाकडून महालक्ष्मी चौकात तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, मराठा समाजावरील अन्याय दूर करावा हे विविध प्रश्न घेऊन मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रावर केल जात आहे, परंतु अनेक ठिकाणी मराठा समाजाचे नेतेच आंदोलनामध्ये सहभागी नसल्याने सर्वसामान्य आंदोलकांकडून मराठा समाजातील नेत्यांचा कठोर शब्दात समाचार घेताना दिसत आहेत. मराठ्यांना आरक्षण जर मिळालं नाही तर त्याला सर्वस्वी जबाबदार मराठा समाजाचे नेते असतील. मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक रेंगाळत पडला तर मराठा समाजाच्या नेत्यांना मराठा समाज फिरून देणार नाही, याचीही समाजातील नेत्यांनी खबरदारी घ्यावी. मराठा समाजाची सहनशीलता संपली आता रुद्र अवतार पहायला तयार राहा, असा इशारा मराठा समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून दिला गेला आहे.
★महालक्ष्मी चौकात तीन तास वाहतूक ठप्प!
चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रभर सुरू असताना बीडमध्ये महालक्ष्मी चौकात तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पुकारलेला हा चक्काजाम आता कुणबी प्रमाणपत्र घेऊनच पुढील आंदोलन शांत होईल अन्यथा अधिक तीव्रता वाढत जाईल यातही शंका नाही असा रुद्रअवतार मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळत होता.
★बीडमध्ये मराठा नेत्यांची चक्काजामला दांडी!
आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांनी चक्क दांडीच मारलेलं पाहायला मिळालं सर्वसामान्य कार्यकर्ते आंदोलनात चक्काजाम मध्ये सहभागी असताना नेतेमंडळी मात्र कुठे दिसली नाही. मग नेतेमंडळींनाच आरक्षण मिळवून द्यायचं नाही का ? असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
★ मराठ्यांच्या नेत्यांनो आता खबरदार – किशोर पिंगळे
मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मराठा समाजातील नेत्यांची मानचिकता नाही का ? आंदोलनात कोणीच कसं सहभागी नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे सोडता एकही पक्षाचा मराठा समाजाचा नेता सहभागी नाही. सर्वसामान्य घरातील मराठा समाजातील पोरं रस्त्यावर उतरत असतानाच जे समाजा मराठ्यांच्या जीवावर राजकारण करतात ते आंदोलनात सहभागी कसे नाहीत ? आता कुणबी प्रमाणपत्र जर मराठा समाजाला मिळाल नाही तर मराठा नेत्यांचं फिरणं मुश्किल करू. मराठ्यांचे नेते दिसतील तिथे कपडे फाडू असा इशारा किशोर पिंगळे यांनी दिला.