6.5 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

बघू, करू शब्द नकोच ; सरसकट कुणबी मराठाच!

[ मराठ्यांचा अंत पाहू नका ; नाहीतर तुमचा खोटा उपटलं ! ]

★शाब्दिक खेळ करून मराठा समाजाला फसवाल तर याद राखा!

[ ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी त्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा ; पाच सदस्यांची समिती गठीत ]

मुंबई : वृत्तांत

मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली. त्यानुसार जे महसुली, निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे. ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक इतर ज्या निजामकालीन नोंदी असतील. त्यांना कुणबी दाखले दिले जातील. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर यासाठी आम्ही एक निवृत्त न्यायमूर्तीसंह पाच सदस्यांची समिती गठीत केली आहे. आगामी महिन्याभरात ते त्यांचा अहवाल देतील. त्यानंतर पडताळणी करून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, असेही ते म्हणाले. यासंदर्भातील जीआर लवकरच निघेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पण मराठा समाज म्हणतोय आता जर फसवलं तर मराठा समाज तुमचा खोटा उपटतील. त्यामुळे आता मराठ्यांना कोणाच्या भानगडीत पडू नका आणि शाब्दिक खेळ करून आंदोलन मोडीत काढण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नका संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

★निवृत्त न्यायाधीशांसह 5 सदस्यीय समिती स्थापन

एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी निवृत्त न्यायधीश संदीप शिंदे यांच्यासह पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे.

★तपासणी, पडताळणी एक महिन्यात अहवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इतर नोंदी निजामकालीन तपासणी, पडताळणी करणे त्याची एसओपी तयार करणे. त्यासाठी पूर्वीची कमिटी देखील मदत करेल. एक महिन्यात अहवाल सादर करेन. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील. संबंधित विभाग म्हणजे हैदराबाद येथील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. वैयक्तिक संवाद मुख्यमंत्र्यांशी साधला जाईल. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची समिती गठीत केली जाईल.

★आम्ही सकारात्मक, जरांगे पाटलांकडून सहकार्याची अपेक्षा

मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे. यातून पूर्णपणे मार्ग काढूया यासाठी पूर्णपणे सरकार सकारात्मक आहे. सुप्रीम कोर्टात देखील केस लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. सुप्रीम कोर्टात ज्या त्रुटी दाखवल्या आहेत. ते सादर करण्याचे काम हे सरकार करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हे सरकारचे धोरण आहे. त्यासाठी बैठका, चर्चा देखील झाल्या आहेत. टीकणारे मराठा आरक्षण दिल्याशिवाय आमचं सरकार स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

★लाठीचार्जची घटना वेदनादायी, संबंधीतांवर कारवाई

लाठीचार्ज संदर्भात संबंधित एसपीला सक्तीची रजा दिली. पोलिस महासंचालकांच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी केली आहे. त्यासाठी आम्ही खंत व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या भावना, सन्मान राखणे हे सरकारचे काम आहे. आंदोलनाच्या आडून कोणीही राजकारण करू नये. या सगळ्यांनी एकत्र येवून सहकार्य करावे, असे आव्हान त्यांनी केली आहे. निर्णय घेताना संपूर्ण परिणामाचा विचार केला जाईल. मनोज जरांगे यांच्या जीवाची काळजी आहे. मराठा समाजाला जे रद्द झालेले आरक्षण त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!