कृतिशील विचारवंत – डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
“गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।”
आपल्या भारतीय संस्कृतीत आईवडीलानंतर गुरूला अनन्यसाधारण महत्त्व-स्थान आहे. पालक जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा आपले आयुष्य मुलांना घडवण्याचे त्यांना ज्ञानाने, मनाने, मानाने सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला नवी दिशा देण्याची आणि भविष्याच्या जडणघडणीत गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.अत्यंत बुद्धिमान ,ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते, उत्तम प्रशासक, पारदर्शी व्यक्तित्व, थोर वेदांती पंडित डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे आधुनिक युगातले एक श्रेष्ठ विचारवंत,शिक्षणतज्ज्ञ,तत्त्वज्ञ होते.अखंड ज्ञानसाधना आणि संशोधन हे जीवन कार्य मांनणारे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. त्यांनी प्राध्यापक, कुलगुरू, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती अशा महत्वाच्या पदावर काम केले. ते एक अभ्यासू प्रभावी व्यक्तिमत्त्व होते ते अत्यंत बुद्धिमान,उच्च विचारसरणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व ,उत्कृष्ट लेखक, तत्त्वज्ञ आणि वक्ते,प्रशासक होते.त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे व प्रभावी होते.एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असायला हवा. ज्ञानाने, तपाने, चारित्र्याने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे, त्यामुळे त्यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून हा लेख.
अशा या महान व्यक्तिमत्वाचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास जवळ तिरुत्तानी या गावी झाला. घरातील धार्मिक वातावरणात माता पित्याकडून मिळालेले विचार त्यामुळे बाल वयातच त्यांच्या मनाची ओढ अध्यात्मा सारख्या विषयाकडे लागले. विसाव्या वर्षी त्यांनी वेदांतातील नीतिशास्त्र हा प्रबंध मद्रास विद्यापीठात सादर केला, डॉ.राधाकृष्णन यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक निरनिराळ्या पदावर कार्य केले. विद्यापीठात तत्वज्ञान याविषयाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली, तत्वज्ञान शिकविण्यामध्ये हातखंडा असल्याने डॉ. राधाकृष्णन त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते.आंध्र प्रदेशाची उपकुलगुरू ते होते.बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.डॉ.राधाकृष्णन यांनी कधीच मोठेपणा मिरवला नाही ते म्हणतात,’जेव्हा आपणास समजते असा अंहकार आपल्यात निर्माण होतो, त्यावेळी आपले ज्ञान व शिक्षण त्याच क्षणी संपते.’
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे ग्रंथ इंग्रजी भाषेतून लिहिले. डॉ.राधाकृष्णन यांनी इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तेथील लोकांना हिंदू धर्म आणि तत्वज्ञानाचे श्रेष्ठत्व प्रभावीपणे समजावून दिले. त्यांच्या त्या भाषणाने ती परिषद गाजली.त्यांची शिक्षण क्षेत्रातील विद्वत्ता पाहून ब्रिटिश सरकारने मानाचा ‘सर’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.युरोप,अमेरिकेत त्यानी तत्त्वज्ञानावर व्याख्याने दिले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. भारत सरकारने नेमलेल्या युनिव्हर्सिटी कमिशनचे ते अध्यक्ष होते. त्यांनी उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले नंतर डॉ. राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती झाले.
जागतिक कीर्ती मिळविणारे थोर तत्त्वज्ञ, श्रेष्ठ विचारवंत, दीर्घानुभवी शिक्षणतज्ज्ञ, महान पंडित डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी आपल्या मायभूमीची बहुमोल सेवा केली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते,त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अमूल्य आहे त्यांच्या जाणतेपणामुळे,कर्तृत्वामुळे, दूरदृष्टीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य झाले. भारतीय शिक्षण कार्यामध्ये त्यांनी भरीव कार्य केले,त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.संपूर्ण जीवन ज्ञानयज्ञासाठी समर्पित केले आणि कृतार्थ जीवन जगले,अश्या या महान अत्यंत बुद्धिमान आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व,भारतीय तत्त्वज्ञ, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते, उत्तम प्रशासक, पारदर्शी व्यक्तित्व, थोर, निश्चिई,कृतिशिल व्यक्तिमत्वास माझा कोटी कोटी प्रणाम….
– राहुल मोरे