★विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकाच्या भुमिका !
विहामांडवा | प्रतिनिधी
पैठण ता ५ आजच्या विद्यार्थ्यात दिसले उद्याच्या शिक्षकाचे प्रतिबिंब तर विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकाच्या भुमिका. आज प्रत्येक वर्गावर शिकवणीसाठी विद्यार्थी झाले होते शिक्षक मराठी, गणित,हिंदी इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल भूमिती हे सर्व विषय आज विद्यार्थ्यांनी शिक्षकाची वेषभूषा करून शिकवले. तर शिक्षक आज साक्षी होऊन बघतच राहिले. पैठण तालुक्यातील नवगांव येथील त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याच्या वतीने स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक म्हणून आनम शेख यांनी कामकाज पाहिले. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारीच कार्यशाळा ठरली तर, हे विद्यार्थ्यांच्या विविध कला दर्शविणारा एक पैलूच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या भावनिक सुसंवादाची जाणीव यातून झाली. स्वयंशासन दिन हा एकदिवसीय अनुभव अन् आनंद वाढवणारा नसुन तो अनुभवाची शिदोरी देणारा दिवस म्हणून कायम मनात घर करून राहतो. तसेच भविष्यात यशाचा दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थ्यांनी ही आठवण आयुष्यभर जपतो.असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक केदार सर यांनी यावेळी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना जबाबदारीने संपूर्ण दिवस शाळा साभांळली. शिक्षक म्हणून शेख आनम,भावले अक्षरा,शेख जुनेहरा,भावले भाग्यश्री, भावले अमृता,पाचे अश्विनी,साबळे धनश्री,पवार सुप्रिया,साबळे राधिका,पठाण मदिया,गवळी आरती,शेख आश्मिरा,शेख शिफा,पठाण आयमन,चौधरी प्रणाली,कार्तिक गलधर,कैफ शेख,स्वप्नील भावले,सार्थक साबळे,वाजेद शेख,आदिल शेख,कुणाल बाबर,महेश पवार,अवधुत फाटके,तुषार मोरे,प्रसाद पोपळघट,आदी मुलांनी
दिवसभर अध्यापक ते शालेय कामकाजाची पाहणी केली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव निरोपाच्या वेळी कथन केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक उल्लास बेतवार, सहशिक्षक ए.व्ही केदार,एस.जे.पठाण, श्रीमती एस.खिंडारी मॅडम, यु.बी.परळकर, रावस एम.जे, डुकरे डि.टी.आय.आय.शेख, नजीर खान यांनी मार्गदर्शन केले. मुलांना शिकत असतानाच जबाबदारीची जाणीव व्हावी, शिक्षकांचे कष्ट समजावेत हा हेतू यामागे आहे.