★लो.डॉ.अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा…!!पिंपरी ‘घुमरी’ येथील जयंती आयोजकांची मागणी.
★साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे हे क्रांतीचे जनक होते–माजी आ. दरेकर नाना
★बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे- महादेव लांडगे
आष्टी | प्रतिनिधी
विश्ववंदनीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊंनी साहित्य आणि निर्मिती करून शेतकरी कामगार कष्टकरी व शोषित एकूणच समाजाचे प्रश्न शासनासमोर मांडले समाजाचे प्रबोधन केले त्यांना न्याय मिळवून दिला.एकूण साहित्य आणि इतिहास वाचून समाजाने त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले.बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटनांच्या वतीने पिंपरी ‘घुमरी’ अण्णा भाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी करण्यात आली होती.या निमित्ताने विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप,गरिबांना अन्नवाटप,वृक्षारोपणाचा कार्यक्रम,असे विविध उपक्रम राबविण्यात आले.पिंपरी (घुमरी) या गावातील ग्रामस्थांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी साहेबराव नाना दरेकर माजी आमदार,यश बाळासाहेब आजबे युवा नेता,सुरेश काका सुदाम गोरखे चैतन्य समूह उद्योग, इनुस चेअरमन गणप्रमुख टाकळी अमिया,राहुल गावडे बोडखा युवा उद्योजक ,ह.भ.प.कवीवर्य लांडगे सर,पत्रकार निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ राज्य प्रसिद्ध प्रमुख आण्णासाहेब साबळे,तानाजी अनभुले ‘निमगाव गांगर्डा’,शिवाजी ननवरे माजी सरपंच,हिंगणी,अशोक सकट (ग्रामपंचायत सदस्य थेरगाव,आदी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे हे क्रांतीचे जनक होते.माजी आ.साहेबराव दरेकर नानांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जयंती साजरा उद्देश लक्षात घ्यावा.
कामे करावीत.वडीलधारांच्या आदर करावा.शिक्षणाकडे लक्ष द्यावे व शेवटी आई वडिलांना सांभाळा असे सांगितले.या निमित्ताने आयोजित अभिवादन सभेत सांगता ‘कर्दमातून कमळ जन्म हा…या अण्णाभाऊं विषयांच्या गिताने श्री महादेव लांडगे सर यांनी केली.नंतर कोमल ताई पाटोळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पिंपरी (घुमरी) या ठिकाणीं करण्यात आला विशेष म्हणजे या ठिकाणी या कार्यक्रमाला महिलांनी जास्त प्रमाणात कार्यक्रम पाहण्याकरता हजेरी लावली,आणि योग्यरीता कार्यक्रम पार पडला,आणि करमाळा या ठिकाणचं गाजलेले हलकी पथकाने कार्यक्रमाचा उत्साह अजून वाढवला,व सांस्कृतिक ढोलकी व सनईच्या सुरात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले,या कार्यक्रमाचे आयोजकाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी व अण्णाभाऊ साठे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या करता उपस्थित मान्यवरांकडे मागणी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ पिंपरी (घुमरी) च्या वतीने करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अण्णाभाऊ साठे पिंपरी (घुमरी) मंडळाचे अध्यक्ष किशोर क्षीरसागर,विकास क्षीरसागर,भागवत भोसले, बाळासाहेब क्षीरसागर,श्रीकांत क्षीरसागर,शिवाजी क्षीरसागर, विशाल भोसले,दत्ता भोसले, नितीन क्षीरसागर,प्रकाश क्षीरसागर,श्याम क्षीरसागर , ज्ञानेश्वर क्षीरसागर,बबन क्षीरसागर,प्रशांत क्षीरसागर ,दादासाहेब साबळे, तान्हाजी क्षीरसागर,उपस्थित होते.