आदर्शवत अनोखा रक्षाबंधन
धामणगाव | दादा पवळ
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.
स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. अंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णाताई पालवे यांनी देशसेवा बजावत असताना पण आपल्या भावाला राखी बांधून आपले भावा बहिणीच्या प्रेमाचे कर्तव्य पूर्ण केले.
“एक नातं ज्याला काही नाव नसतं, भाषा बंधन नसतं,
फक्त विश्वास ठेवणारा नेता म्हणजे निखळ प्रेम आणि कधी तुझं भांडण, भांडण व्यवस्था, भांडण व्यवस्था, रुसवे फुगवे उपचार पण ते फक्त काही नगरसेवका पुरता, कारण ते फक्त बोलत नसतं, हाच प्रेम नाही. आणि विश्वास अजून घट्ट राहतो आणि आमच्यातील हे नातं असंच अनेक वर्ष बहरत राहो हीच प्रार्थना”
लेखक. दादा पवळ
(पत्रकार सामाजिक कार्यकर्ते) मो.९६८९१३४२४६