★मुख्यअधिकारी व नगराध्यक्ष यांनी पूर्वकल्पना द्यायला हवी – सर्वसामान्य जनता
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी शहरांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या म्हणण्यानुसार दहा ते पंधरा दिवस झाले पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी रुटी इमनगाव तलावातील पाणीसाठा खोल गेल्यामुळे आष्टी शहरातील जनतेला दोन दिवस उशिराने पाणी मिळणार बोलताना सांगितले परंतु जनता म्हणत आहे की कपात करण्यापूर्वी थोडी पूर्वकल्पना द्यायला हवी ती कल्पना मुख्याधिकारी व नगरअध्यक्ष यांनी कसलीच न दिल्याने खूप हाल होत आहे.
आष्टी शहरात पाण्याचा आलेला विस्कळीतपणा हा सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरत आहे. पाण्यासंदर्भात मुख्य अधिकारी नगराध्यक्ष नगरपंचायतकडून योग्य ते पाऊल न उचलता जनतेला संभ्रमात ठेवत पाणी कपात केल्याचे दिसून येत आहे. जनतेला कोणताच विश्वासात न घेता केलेली पाणी कपात ही जनतेला त्रासदायक ठरत आहे. दहा ते पंधरा दिवस झालं पाणी मिळत नसल्याने जनता त्रस्त आहे. सर्वसामान्य जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होताना सुद्धा दिसत आहे.
★पाणीसाठा अत्यंत कमी ; जनतेने काटकसरीने पाणी वापरावे
आष्टी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या रुटी इमनगाव तलावातील पाणीसाठा खोल गेल्यामुळे आष्टी शहरातील जनतेला दोन दिवस उशिराने पाणी मिळणार आहे, तसेच पावसाचे आगमन लांबल्यामुळे आष्टी शहरासाठी पाणीपुरवठा करणारे तलावात पाणीसाठा अत्यंत कमी स्वरूपात उपलब्ध आहे, तरी जनतेने काटकसरीने पाणी वापरावे आशी प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे.
– बाळदत्त मोरे
मुख्याधिकारी आष्टी
★निष्काळजीपणा मुळे शहरातील नागरिक त्रस्त!
वारंवार मुख्याधिकारी,नगराध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती यांना कल्पना देऊन देखील ते कसलीच दखल घेत नाहीत, अचानकपणे शहरातील पाणी पुरवठ्यात विस्कळीतपणा येतो, एक तर शहराला 8 ते 10 दिवसाला पाणी येते त्यात पण हा निष्काळजीपणा त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. नगरपंचायतने यात विशेष लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा..!
– शेख नाजीम रशीद
नगरसेवक तथा गटनेते
नगर पंचायत आष्टी.