6.9 C
New York
Sunday, November 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठ्यांचे डोंगरकिन्हीत अन्नत्याग आंदोलन ; अंतरवालीच्या आंदोलनाला पाठिंबा!

[घाणेरड्या राजकारणाचे फडणवीस केंद्रबिंदू ?]

★अंतरवाली नंतर डोंगरकिन्हीत पडली मराठ्यांची दुसरी ठिणगी!

पाटोदा | सचिन पवार

मराठा समाजासाठी अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या खाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाला प्रशासनाकडून झालेला लाठीचार्ज त्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाला डोंगर किनीतील मराठ्यांकडून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले असून जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आणि मनोज जरांगे यांचा आंदोलन संपत नाही तोपर्यंत डोंगरकिन्हीचं अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असं डोंगरकिन्हीतील मराठा समाजाकडून सांगितले गेले आहे.
अंतरवाली सराटी गावाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डोंगरकिन्हीतील मराठा समाज झाला आक्रमक दोन दिवसापासून अण्णा त्यात आंदोलन सुरू अनेक पक्षाच्या नेत्यांनी दिल्या भेटी जोपर्यंत मनोज रंग यांचा आंदोलन सुरू राहील तोपर्यंत डोंगरकिन्हीतील अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील अशी मराठा समाजाकडून भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजावर सातत्याने अन्याय होत गेला आहे. मराठा समाजाने शांततेत लाखोंचे मोर्चे काढले परंतु त्यात कधीही गालबोट लागली नाही. अंतरवाली सराटी गावचा आंदोलनाला गालबोट प्रशासनाकडून लागली आहे. प्रशासनाच्या आणि सरकारच्या निषेधार्थ पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला असून आंतरवाली सराटी गावाच्या समर्थनार्थ डोंगर किनी येथे मराठा समाजाकडून अन्न त्या आंदोलन पुकारले असून दोन दिवस झाले हे आंदोलन सुरू असून अनेक नेतेमंडळींनी या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे जोपर्यंत मनोज रंग यांचं आंदोलन सुरू राहील तोपर्यंत डोंगरकिन्हीतील अन्न त्यात आंदोलन सुरूच राहील असं मराठा समाजाकडून जाहीर करण्यात आला आहे.

★फडणवीस घाणेरडे राजकारण सोशल मीडियावर चर्चा!

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवली सराटी गावामध्ये सुरू असलेले आंदोलन त्याला लागलेलं गालबोट हे गृहमंत्र्याच्या आदेशावरून झालं त्याची कुजबुज गावोगावी सुरू झाली आहे मराठा समाजात द्वेष पेरण्याचं काम आणि समाजाला गालबोट लावण्यासाठी फडणवीस कृती अवलंबत असल्याची सुद्धा चर्चा ऐकण्यास मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकारण घाणेरडे होत चालल्याचे सुद्धा कुजबूज ऐकायला मिळत आहे.

★जोपर्यंत मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू तोपर्यंत डोंगरकिन्हीतील अन्नत्याग आंदोलन सुरू

अंतरवाली सराटी गावच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डोंगर किनीतील मराठा युवकांनी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन हे आंदोलन जोपर्यंत मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलन सुरू राहील तोपर्यंत डोंगर किनीतील अन्नत्याग आंदोलन सुरू राहील असं देखील मराठा बांधवांकडून सांगण्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ या विषयावर हात घालून कारवाई करावी अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल अशा देखील भावना व्यक्त होत आहेत.

★कारेगावच्या मुस्लिम बांधवांचा अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा!

डोंगरकिन्ही येथे मराठा बांधवाकडून पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला कारेगावच्या मुस्लिम बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. समाजाने नेहमीच महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे. आता मराठा समाजावर होत असलेला अन्याय आणि त्यांना मिळत नसलेला न्याय त्यासाठी सुरू असलेलं आंदोलन त्या आंदोलनाला कारेगाव येथील मुस्लिम बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!