[ गृहमंत्री फडणवीसांची कूटनीती ; जनतेकडून रोष व्यक्त ! ]
★संताप.. संताप.. आणि संताप…!लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात मराठे रस्त्यावर..
★शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे, संभाजीराजे, यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या आंदोलन स्थळी भेटी!
बीड | सचिन पवार
कुणाचा तरी फोन आला अन् त्यानंतर ॲक्शन आमच्या आया बहिणींनाही सोडले नाही हो! जखमी आंदोलकांच्या भावनांचा फुटला बांध.
मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीमार केला. त्यात महिलांसह अनेकजण जखमी झाले. या घटनेमुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू केली आहे. विरोधकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करताना महिलांनाही सोडले नाही. या घटनेची आपबीती सांगताना जखमी आंदोलक अत्यंत व्याकुळ होताना दिसून येत आहेत.संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी गावात जावून आंदोलक व रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या जखमींची भेट घेतली. त्यांनी त्यांचे सांत्वन करून झाल्या घटनेची माहिती घेतली. तसेच त्यांना सर्वकाही ठिक होण्याचा धीरही दिला. यावेळी एका जखमी आंदोलकाने एक फोन आला अन् त्यानंतर अचानक लाठीमार झाल्याचे सांगितले.
★हेच सुराज्य आहे का?
आमच्यावर निजामाचे राज्य होते, मोघलांचे राज्य होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि इंग्रजांचे राज्य आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही राज्य करत आहात, हेच सुराज्य आहे का? असा सवाल संभाजीराजे यांनी व्यक्त केला. असे असताना मराठा आंदोलकांवर तुम्हाला गोळ्या झाडायच्या आहेत का? असेच होत असेल तर मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून सांगतो. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर आधी संभाजी छत्रपतींवर गोळी घाला.
★एवढे टोकाचे पाऊल का उचलले? मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारला एवढे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न करत मराठी माणसाच्या आक्रोशातून उभे राहणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
★आंदोलकांवर बळाचा वापर केला गेला
मुंबईवरून कोणाचा तरी फोन आला. त्यानंतर पोलिस बोलावले गेले. अतिशय अमानुषपणे आंदोलकांवर हल्ला लाठीचार्ज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे काही व्हिडिओ समोर येत आहेत. त्यात पोलिसांकडूनच आंदोलकांवर व ज्यांचा यात काहीही संबंध नव्हता, अशा लोकांवर देखील व महिलांवर देखील हल्ला करण्यात आलेला आहे. एका प्रकारे आंदोलकांवर व ग्रामस्थांवर बळाचा वापर करण्यात आलेला आहे.
★न्यायालयीन चौकशीची मागणी
शरद पवार म्हणाले की, जालन्यातील आंदोलकांवर ज्या पद्धतीने बळाचा वापर करून हल्ला केला गेला तो अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी होईल, असे सांगितले जात आहे. ते पूर्णपणे चुकीची राहील. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी. अशी मागणी शरद पवार यांनी केली.
★समाजाला न्याय मिळत नसेल तर दुर्दैवी बाब
गायकवाड कमिशनमध्ये थोड्याफार चुका होत्या. त्यात दुरूस्ती करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं. मी सर्वांना आवाहन करतो. आपल्याला शांततेन आंदोलन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण पाईक आहोत. मराठा समाजाला न्याय मिळत नसेल, तर यापेक्षा दुर्दैवी बाब नाही, असेही उदयनराजे म्हणाले.
★मग वरचा फोन कोणाचा ?
सखोल आदेश दिले आहेत. किती खोल जाणार आहेत. मोर्चाची मागणी मुख्यमंत्र्यांना दिली जाते. मग वरचा फोन कुणाचा होता, हे देखील आम्हाला कळले पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी शिंदे यांचे नाव न घेता विचारला. गोवारी हत्याकांडात मधुकर पिचड यांचा राजीनामा घेतला होता. मग फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील ठाकरेंनी केली.
★सोशल मीडियावर फडणवीस च्या कूटनीतीचा पडदा फाडला!
मराठा समाजाचा आंदोलन चिघळल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कूटनीतीचा मराठा युवकांकडून पडदा पाडला गेला आहे. फडणवीस यांची कूटनीती सर्वांच्याच लक्षात येऊ लागली आहे मराठा युवकांकडून फडणवीसांच्या चांगलाच समाचार घेतलेला दिसत आहे. फडणवीस यांनी आदेश दिल्याशिवाय पोलिसांनी लाठीचार्ज केलाच नाही. फडणवीसन मुळेच मराठा आंदोलन चिघळले आहे. सोशल मीडियावर पोस्ट चांगल्याच फायर होत आहेत.