★फडणवीस साहेब तुम्ही शिंदे-पवारांना दावणीला बांधलं बरं !
★मराठा आरक्षण आंदोलनात झालेला लाठी चार्ज भाजपची कूटनीती स्पष्ट समोर उभी ?
★आरक्षणासाठी गेल्या 3 दिवसांपासून सुरू होते आंदोलन !
बीड | सचिन पवार
जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. हे आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते. त्यांची शुक्रवारी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. या घटनेमुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांची परिस्थिती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण मागे घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
★आंदोलन स्थळी नेमके घडले काय ?
बेमुदत उपोषण स्थळी उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलिस आले असता मंडपातील नागरिक व पोलिसांचा मोठा राडा झाला. या दरम्यान बाचाबाची होऊन या ठिकाणी दगडफेक, लाठी चार्ज झाला. गावातील आनेक नागरिक जखमी झाले, पोलिस देखील जखमी झाले आहेत. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. तरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शुक्रवारी तालुका 1 रोजी गालबोट लागले. अप्पर पोलिस अधिक्षक राहुल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली यात तोडगा निघाला नाही. दरम्यान पोलिस व जमाव यांच्यामध्ये मोठा वाद होऊन हा प्रकार घडला.
★3 जिल्ह्यांतील गावांमध्ये बंद!
मराठा आरक्षणासह अनेक मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणाला सुरूृुवात केली आहे. मंगळवारपासून सुरू असलेले उपोषण अजूनही सुरू असून मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही त्यांनी आपले उपोषण मागे घेतले नाही. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील आणि शेजारीत तीन जिल्ह्यांतील अनेक गावांनी कडकडीत बंद पाळला आहे.
★ग्रामसभेत ठराव घेऊन कडकडीत बंद पाळला!
जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीसह जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील अनेक गावांनी बंद पुकारला. वडीगोद्री, शहागड, विहामांडवा, उमापूर, तिर्थपुरी, साष्टपिंपळगाव, हादगाव, शहापूर, मादळमोही, कोळगाव, मांजरसुंबा, गोंदी, धोंडराई या गावातील व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी बंद पुकारत उपोषणाला पाठिंबा दिला आहे. नागरिकांचाही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वडीगोद्री ग्रामपंचायतीने गुरुवारी ग्रामसभेत ठराव घेऊन कडकडीत बंद पाळला.
★सोशल मीडियावर फडणवीस-शिंदे-पवारांचा चांगलाच समाचार!
जालना येथे सुरू असलेलं मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळल्याने मराठा समाजातील तरुण सोशल मीडियावर राग व्यक्त करताना दिसत आहेत फडणवीस शिंदे पवार त्यांच्यावर चांगलेच तुटून पडलेले दिसत आहे. तुम्हाला न्याय द्यायचा नसेल तर देऊ नका परंतु लाठी चार्ज करून मराठ्यांचा अंत पाहू नका. मराठ्यांचा लांबट केसांनी गळा कापल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत.