★सेवापूर्तीला असलेली उपस्थिती ही त्यांच्या कार्याची ओळख असते !
अंमळनेर | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक सुग्रीव सिताराम नेटके(नाना)यांची वयोमानानुसार ३१ आँगष्ट रोजी सेवा संपुष्टात आली . त्यांचा सेवापूर्ती गोरव सोहळा अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने समोरील प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. अनेक मित्र परिवार ,आप्तेष्ट, नातेवाईक, कर्मचारी यांनी शाल,श्रीफळ,फेटा, पुष्पगुच्छ, संपूर्ण पोषाख देऊन सपत्नीक सत्कार करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माऊली जरांगे म्हणाले की, आम्ही लोकप्रतिनिधी जनता आणि अधिकारी यांचा दुवा म्हणून काम करीत असतोत, माझ्या कार्यकाळात जेंव्हा ,जेंव्हा आरोग्य केंद्रा संदर्भात अडचणी भाषल्या त्यावेळी आरोग्य सहाय्यक सुग्रीव नेटके यांनी योग्य प्रकारे हाताळण्याचे काम केले. कोणत्याही कर्मचार्याने त्यांच्या कार्यकाळात कसे काम केले याची प्रचिती त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या उपस्थिती वरुन दिसुन येत असते आणि त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला जमलेली मोठी उपस्थिती त्यांच्या कामाची ओळख करुन देते असे प्रतिपादन माऊली जरांगे यांनी केले.
प्रारंभी उपस्थिती मान्यवरांचे स्वागत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी परमेश्वर बडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.त्यानंतर कर्मचारी, पत्रकार, सरपंच, मित्रपरिवार, नातेवाईक, यांनी सपत्नीक सुग्रीव नेटके यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार केला.
याप्रसंगी डॉ. संजय कदम,डॉ. लक्ष्मीकांत तांदळे,वैद्यकीय अधिकारी परमेश्वर बडे,राजेंद्र ,कुंडे,रुक्मिणी पवार, दराडे,सरपंच अशोक जेधे, नामदेव जाधव,ग्रा.प.सदस्य पिनु पोकळे,आदिंनी आपल्या भावना व्यक्त करीत सुग्रीव नेटके यांच्या कार्याचा उजाळा केला.याप्रसंगी डॉ. चैत्राली भोंडवे, डॉ. मयुर शिंदे, डॉ. कासट,डॉ.तिडके,माजी सरपंच उद्धवशेठ पवार, महेश खेंगरे,सोमनाथ गाडे,गोविंद गाडे,महावीर पवार ,सतिष पवार,भिल्लारे महाराज, पत्रकार बबनराव उकांडे, चंद्रकांत(भाऊ) पवार, अविराज पवार, विशाल पोकळे यांच्यासह अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आशासेविका,आरोग्य सेविका ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .सुत्रसंचालन राजेंद्र सकुंडे, यांनी केले तर सर्व उपस्थित बांधवांचे आभार सत्कारमुर्ती सुग्रीव नेटके यांनी मानुन यापुढेही सामाजिक कार्य सुरुच ठेवण्याचे आवर्जून सांगितले. शेवटी मिष्टान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.